

पणजी: काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणाऱ्या गोवा रक्षण यात्रेला उद्या (ता. २२) पणजीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरुवात होणार आहे. ही यात्रा २७ दिवसांत राज्याच्या ४० मतदारसंघांतून फिरणार आहे.
या यात्रेत सहभागी होण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी, तसेच पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसह तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी १८ ऑक्टोबर रोजी गोव्याला भेट देऊन या यात्रेचा समारोप करतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.
काँग्रेस भवनात सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत यात्रेची माहिती देण्यात आली. याप्रसंगी गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, सहप्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, कार्याध्यक्ष सुनील कवठणकर यांची उपस्थिती होती.
चोडणकर म्हणाले, की बुधवारी (ता. २३) कुंभारजुवे ते प्रियोळ यात्रेला पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हिरवा झेंडा दाखवतील. तेथून ही यात्रा इतर मतदारसंघांकडे प्रस्थान करेल. समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनाही निमंत्रित केले आहे. काँग्रेसशी संबंधित नसलेले लोक आणि समान विचारसरणीच्या इतर राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनीही या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे. या यात्रेत १०० कायमस्वरूपी सदस्य राहतील.
दररोज किमान दोन मतदारसंघांतून यात्रा निघेल. त्यावेळी लोकांशी संपर्क साधण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल, असे चोडणकर यांनी नमूद केले. युरी आलेमाव म्हणाले, की या यात्रेविषयी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वेबसाईट लॉन्च केली होती. त्याला राज्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. ही यात्रा ऐतिहासिक ठरणार असून ती पक्षाची नसून लोकांची आहे.
लोकांची मतेही जाणून घेणार : युरी
या यात्रेत सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, युवक, कलाकार, खेळाडूंनी सहभागी व्हावे. भाजप सरकारने कॅश फॉर जॉब, कला अकादमी, स्मार्ट सिटी, टॅक्सी मीटर, वीज मीटर घोटाळा, ‘३९-ए’ भूखंड घोटाळा केला आहे. त्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि लोकांची मतेही जाणून घेणार आहोत, असे युरी आलेमाव म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.