

चावडी: काणकोण तालुक्यातील मोखर्ड येथे राहणाऱ्या रेखा कामत (वय ७८ वर्षे) आणि मेघा कामत (वय ७२ वर्षे) या दोन बहिणींचे मृतदेह त्यांच्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिस तपासात या दोघींनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनास्थळी पोलिसांना आत्महत्येसंदर्भातील एक चिठ्ठी आढळून आली. तसेच अंत्यसंस्कारासाठी स्वतंत्रपणे ठेवलेली रक्कमही सापडली. त्यामुळे मृत्युपूर्वी दोन्ही बहिणींनी तयारी केल्याचा महत्त्वाचा धागा तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी कुंकळ्ळी येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाशी संपर्क साधला.
त्यानंतर काणकोण पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. शवचिकित्सा पूर्ण झाली असून, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी डॉक्टरांनी पुढील तपासणीसाठी व्हिसेरा जतन केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास काणकोण पोलिस करीत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.