Goa Weather Canva
गोवा

Goa Weather: सावधान! गोव्यात पुढील पाच दिवस उष्मा वाढणार; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

Goa Weather Update: राज्यात पुढील चार-पाच दिवस ही तापमानवाढ कायम राहणार असून विशेषतः सकाळी १० नंतर दुपारी २ पर्यंत मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवेल.

Sameer Panditrao

Goa Weather News

पणजी: राज्यात पुढील चार-पाच दिवस ही तापमानवाढ कायम राहणार असून विशेषतः सकाळी १० नंतर दुपारी २ पर्यंत मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवेल. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी सांगितले.

राज्यात मागील दोन चार दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमामात वाढ झाली आहे. सातत्याने कमाल तापमानात वाढ होत असून आज राज्यात ३५.५ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. जी सामान्य तापमानाच्या तुलनेत तब्बल ३.१ अंश सेल्सिअसने अधिक झाल्याने ऐन हिवाळ्यात घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

दरम्यान, कुलकर्णी म्हणाले, सर्वसामान्यपणे हा कालावधी हा ऋतूमान बदलाचा असल्याने काहीप्रमाणात उष्म्यात वाढ झाली आहे. राज्यात उत्तरेकडील वाऱ्याचा प्रभावही दिसून येत आहे त्यामुळे पुढील चार-पाच राज्यातील कमाल तापमान हे ३४ अंश आणि किमान तापमान २२ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी!

राज्यात आता साहजिकपणे थंडीचा प्रभाव कमी होत उष्मा वाढत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्म्यापासून आपला बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेणे जरूरीचे आहे. दुपारच्यावेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. आवश्‍यकतेनुसार पाणी प्यावे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांना उष्म्याचा परिणाम अधिक जाणवतो. त्यामुळे त्यांची योग्य ती काळजी घ्यावी. लिंबू पाणी, शहाळे, आदींचे सेवन करणे अधिक उत्तम. उष्माघाताचा त्रास झाल्यास शक्य तेवढ्या लवकर नागरिकांनी आरोग्य केंद्रात जाऊन योग्य ते उपाचार घ्यावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT