Virdi Dam Dispute  Dainik Gomantak
गोवा

Virdi Dam Dispute : विर्डी धरणाचे काम थांबवा; गोव्‍याची महाराष्ट्राला नोटीस

‘सीडब्ल्यूसी’ची परवानगी नाही; बेकायदा बांधकाम सुरू

दैनिक गोमन्तक डिजिटल

Virdi Dam Dispute: कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागाकडून दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथे बेकायदा धरण प्रकल्प उभारण्याच्या बांधकामाला सुरूवात करण्‍यात आली आहे.

त्‍याची तातडीने दखल घेऊन गोवा सरकारने महाराष्ट्राला काम थांबविण्याची नोटीस पाठविली असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी दिली.

कर्नाटककडून पाणी वळविण्‍याच्‍या विरोधात गोव्‍यात असंतोषाचे वातावरण आहे. ‘आता महाराष्ट्राकडूनही विर्डी येथे वाळवंटी नदीवर पाच ठिकाणी छोटे बंधारे आणि धरण प्रकल्प उभारून पाणी वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

हे काम तातडीने थांबवावे अशी सूचना करणारी नोटीस गोवा सरकारने महाराष्‍ट्राला पाठविली आहे.

केंद्रीय जलविवाद लवादाने 2013 मध्ये महाराष्ट्र सरकारला 1.33 टीएमसी पाणी नदीपरिक्षेत्रात (बेसीन) वापरण्याची परवानगी दिली असली तरी त्यासाठी केंद्रीय जलआयोग, केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे असे स्पष्ट केले आहे.

या परवानग्या नसतानाच बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. त्‍यामुळे गोव्‍याने ही नोटीस पाठविली आहे.

तीन राज्यांच्‍या याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत प्रलंबित

तीन राज्यांनी दाखल केलेल्या विशेष याचिका सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी प्रलंबित असल्या तरी महाराष्ट्राने दोडामार्ग तालुक्यातील विर्डी धरणाचे काम 2011 मध्येच सुरू केले होते. आक्षेपानंतर ते बंद ठेवण्यात आले.

14 ऑगस्ट 2018रोजी, न्यायाधिकरणाने अंतिम निवाडा दिला आणि महाराष्ट्राला 1.33 टीएमसी पाणी वापरण्‍याची परवानगी दिली. आता केंद्र सरकारने नव्याने म्हादई-प्रवाह प्राधिकरण स्थापन केले आहे. त्‍यामुळे या संपूर्ण प्रकल्पांवर नव्‍याने पुनर्विचार होण्याची शक्यता आहे.

पाच धरणांचा प्रकल्प

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात विर्डी येथील काटिका नाल्यावर हे प्रस्तावित धरण असून त्याची उंची 48.37 मीटर तर लांबी 736 मीटर आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 14.13 एमसीएम असेल.

शिवाय विर्डी (ब), मोराची राई, धनगरवाडी आणि आंबडगाव येथेही छोटे पाटबंधारे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

त्यामुळे हे पाणी जलविवाद लवादाने दिलेल्या 1.33 टीएमसीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचा साखळी, पडोसे आणि बार्देश तालुक्यातील जलप्रकल्पांवर परिणाम होणार आहे.

"म्हादईच्या पाण्यासाठी कर्नाटक सरकारने वनांचा संहार करत ज्या पद्धतीने बेकायदेशीरपणे पाणी वळविण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने महाराष्ट्रही आता वाळवंटीचे पाणी वळविण्याचा प्रयत्न करत आहे. याचा एकूणच परिणाम म्हादईच्या तसेच मांडवी नदीच्या पाण्यावर होणार आहे."

- राजेंद्र केरकर, पर्यावरण अभ्यासक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT