SpiceJet : आता स्पाइस जेटही करणार कोकणीतून उद्घोषणा

चर्चिल आलेमाव यांच्या पुतण्या वॉरन आलेमाव यांनी केली होती विनंती
Warren Alemao
Warren AlemaoDainik Gomantak

इंडीगो आणि गो एअर या विमान कंपन्यानंतर आता गोव्यात येणाऱ्या आणि गोव्यातून निर्गमन करणाऱ्या स्पाइस जेट कंपनीच्या विमानातून कोकणीतून उद्घोषणा (अनाउंसमेंट) करणार आहे.

माजी आमदार चर्चिल आलेमाव यांचे पुतणे आणि समाज सेवक वॉरन आलेमाव यांनी ही माहिती दिली आहे. वॉरन यांनी स्पाईस जेटच्या व्यवस्थापनाकडे विमानात कोकणी भाषेतून उद्घोषणा करण्यात याव्यात अशी मागणी केली होती.

Warren Alemao
Goa Corona Update: राज्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ; सक्रीय कोरोनारूग्णांची संख्या 713 वर

दरम्यान, ही मागणी मान्य करण्यात आली आहे. याबाबत विमान कंपनीकडून पत्राद्वारे वॉरन आलेमाव यांना कळविण्यात आले. या कंपनीचे सीएमओ देबोजो महर्षी यांनी हे पत्र लिहिले आहे.

यावर प्रतिक्रीया व्यक्त करताना, "आमच्या मातृभाषेतून उद्घोषणा ऐकू येणे ही आमच्यासाठी भाग्याची आणि आनंदाची बाब आहे. ही मागणी मान्य केल्याबद्दल मी स्पाइस जेट कंपनीचे अध्यक्ष अजय सिंग यांचा आभारी आहे" असे वॉरन आलेमाव यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com