Goa Naval Area: स्थळ गोवा, रात्रीची वेळ आणि INS विक्रांतवर झाले हेलिकॉप्टरचे लॅन्डिंग

गोव्यातील नौदलाच्या बेसवर काही दिवासांपूर्वी एक यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्याची माहिती सध्या समोर आली आहे.
landing of helicopters on INS Vikrant
landing of helicopters on INS VikrantGoa Naval Area Twitter Handle
Published on
Updated on

Goa Naval Area: नौदल कमांडर्ससाठी लष्करी-सामरिक पातळीवर सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, नौदल कमांडर्स परिषद 2023 चा पहिला टप्पा 06 मार्च रोजी गोव्यात पार पडला. प्रथमच भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका, आय एन एस विक्रांत जहाजावर ही परिषद झाली.

परिषदेच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गोव्यात हजेरी लावत त्यांनी, आय एन एस विक्रांतच्या नौदल कमांडर्सना संबोधित केले. दरम्यान, गोव्यातील नौदलाच्या बेसवर काही दिवासांपूर्वी एक यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्याची माहिती सध्या समोर आली आहे.

landing of helicopters on INS Vikrant
landing of helicopters on INS VikrantGoa Naval Area Twitter Handle

INS विक्रांतवर रात्री हेलिकॉप्टरचे पहिले यशस्वी लँडिंग करण्यात आले. INAS 339 मधील पायलट आणि एअर टेक ऑफिसरच्या कामोव्ह 31 च्या टीमने हे लँडिंग यशस्वी केले. गोवा नौदल प्रदेशच्या वतीन याबाबत नुकतेच माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.

चाचणीचा एक भाग म्हणून, स्वदेशी वाहकांकडून लाइटिंग आणि शिपबॉर्न सिस्टमचा वापर करण्यात आले असे नौदलाने म्हटले आहे. 28 मार्च रोजी ही चाचणी करण्यात आली.

landing of helicopters on INS Vikrant
AI च्या नजरेतून असा दिसतो 'जुना गोवा', फोटोज् पाहून काही आठवतंय का बघा...
landing of helicopters on INS Vikrant
landing of helicopters on INS VikrantGoa Naval Area Twitter Handle

दरम्यान, 06 ते 23 मार्च याकाळात झालेल्या परिषदेत, संरक्षण कर्मचारी प्रमुख आणि भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल प्रमुख यांनी नौदल कमांडर्सशी संवाद साधला. देशाचं संरक्षण, भारताच्या राष्ट्रीय हितासाठी समन्वय आणि तत्परता साधण्याच्या हेतूने या तिन्ही सेवांमध्ये सामायिक वातावरण आणि त्रि-सेवा वाढवण्याच्या मार्गांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. 

यावेळी नौदल कर्मचारी प्रमुख इतर नौदल कमांडरसह भारतीय नौदलाने गेल्या सहा महिन्यांत हाती घेतलेलं प्रमुख ऑपरेशन, युद्धसामग्री, व्यूहशास्त्र, मानव संसाधन विकास, प्रशिक्षण आणि प्रशासकीय उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com