Goa liquor smuggling control Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

liquor smuggling Goa: बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले

Akshata Chhatre

पणजी: धारगळ येथील राष्ट्रीय महामार्गावर (NH66) १७ जून रोजी नागालँड नोंदणीकृत (NL 01 N 2598) एका दारूच्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने गोव्यातील अवैध दारू तस्करीचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला. १७ जून रोजी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर चालक आणि इतर कर्मचारी गाडीला त्याच अवस्थेत सोडून निघून गेले होते. या प्रसंगाचे उदाहरण देत, बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

अवैध साठ्यावर मुख्यमंत्र्यांची गंभीर भूमिका

धारगळ घटनेवर आमदार विजय सरदेसाई आणि आमदार वेंझी व्हिएगस यांनी विधानसभेत प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारला घेरले. "गोव्यात दारूचे वैध वितरक असतानाही अवैध दारूची तस्करी कशी होते?" असा रोखठोक सवाल आमदार व्हिएगस यांनी विचारत सीमाशुल्क विभागाच्या तपासणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

प्रश्न विचारला असता, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी सभागृहाला १७ जून रोजी धारगळजवळ जळालेल्या आणि नंतर बेवारस अवस्थेत सापडलेल्या कंटेनर ट्रकची, गोव्यात प्रवेश करताना कोणत्याही आंतरराज्य चेकपोस्ट किंवा वेब्रिजवरून गेल्याची नोंद आहे का? असाही प्रश्न केला.

यावर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वाहनाने कोणत्याही राज्य तपासणी नाक्यावर किंवा वेब्रिजवरून प्रवास केल्याची नोंद नसल्याची माहिती दिली आणि ते पुढे म्हणाले की, अधिकारी सध्या ट्रकच्या मालकाचा आणि या संशयित अवैध दारूच्या साठ्याच्या उगमाचा शोध घेत आहेत. अद्याप जप्त केलेल्या बाटल्यांवर कोणतेही निर्यात परवाने किंवा वाहतुकीचे परवाने आढळले नाहीत.

हा साठा गोव्यात नोंदणीकृत आहे की नाही, तसेच अद्याप ही दारू कोणत्या कारखान्यात तयार झाली, हे निश्चित झाले नसल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, "या दारूचा स्रोत निश्चित झाल्यावर संबंधित कारखाना जप्त केला जाईल, त्यांचा परवाना रद्द केला जाईल आणि उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित निरीक्षकाला त्याच्या कामात चूक आढळल्यास निलंबित केले जाईल."

तस्करी रोखण्यासाठी 'होलोग्राम स्टिकर्स'चा प्रस्ताव

गोव्यातून महाराष्ट्रात, विशेषतः लाटंबार्सेमार्गे, आणि तिथून गुजरातपर्यंत दारूची तस्करी होत असल्याचा मुद्दा आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला. या भागात चेकपोस्ट नसल्यामुळे बेकायदा दारू वाहतुकीला ऊत आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित प्रतिक्रिया देत सांगितले की, लाटंबार्सेतून महाराष्ट्रात जाणाऱ्या रस्त्यावर चेकपोस्ट उभारले जातील. यामुळे अवैध दारू वाहतुकीला आळा बसण्यास मदत होईल.

तसेच, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोव्यात तयार होणाऱ्या दारूसाठी होलोग्राम स्टिकर्स लागू करण्याचा प्रस्तवाचा विचार सुरु असल्याचेही सांगितले. दारूची वाहतूक आणि पुरवठा यांचा मागोवा घेण्यासाठी हे स्टिकर्स उपयुक्त ठरतील, असे ते म्हणाले. राज्यात कोणतीही बनावट दारू विकली जात नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: गोव्यातून पावसाची एक्झिट नाहीच! मध्यम पावसाची शक्यता, हवामान खात्याचा 'यलो अलर्ट'

Sawantwadi Crime: इन्सुली नाक्यावर 94 लाख तर, वेर्ले गावात 22 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त

Goa Live News: क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर पडला फॅन, विद्यार्थी जखमी; पर्वरी सत्तरीतील सरकारी शाळेतील घटना

पाकड्यांची मस्ती काय उतरेना... 'तुला 3 चेंडूत आऊट करेन!' पाकच्या गोलंदाजाचं अभिषेक शर्माला थेट आव्हान Video Viral

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

SCROLL FOR NEXT