
पणजी: परराज्यात नोंद असलेली वाहने राज्यात अमर्याद काळ वापरता येत नाहीत. त्यामुळे ती वाहने गोव्यात नोंद करण्याची कायद्यातील तरतूद सक्तीने वापरावी, अशी मागणी आमदार दिलायला लोबो यांनी विधानसभेत केली.
वाहतूक, उद्योग व्यापार व वाणिज्य आणि पंचायत खात्यांच्या अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना त्या म्हणाल्या, डिलिव्हिरी बॉय म्हणून काम करणाऱ्यांच्या दुचाक्या या परराज्यात नोंदणी केलेल्या असतात. भाडेकरूंची ज्या पद्धतीने तपासणी केली जाते, तशी या दुचाकीस्वारांची तपासणी होणे आवश्यक आहे. तसेच या दुचाकीस्वारांची वाहने ही गोव्यात नोंदीत असावीत.
टॅक्सी हा स्वयंरोजगार आहे. त्यामुळे हा व्यवसाय संरक्षित केला जावा. टॅक्सी व्यवसायिकांनी वाहतूक खात्याने जे दर निश्चित केले आहेत ते दर आकारावेत. गोवा माईल्स कमी दर आकारतात ते बंद व्हायला हवे. नवे टॅक्सी परवाने दिले जावेत. मोठमोठे उपक्रम राज्यात होतात, तेव्हा परराज्यातील टॅक्सी आणल्या जातात.
त्यामुळे मोठ्या उपक्रमांवेळी स्थानिकांच्या टॅक्सी मिळू शकतात. दाबोळी विमानतळावर प्रवाशांना घेण्यासाठी गेल्यानंतर तेथे चालकाला ५० रुपये शुल्क आकारले जाते, पण मोपा विमानतळावर प्रवेश शुल्क २०० रुपये द्यावे लागते व पाच मिनिटांपेक्षा अधिक वेळ गेला, तर ५०० रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे किमान टॅक्सीचालकांना २०० रुपयांमध्ये १० मिनिटांचा थांबा द्यावा, असे त्या म्हणाल्या. माशेल पंचायतीचा महसूल बुडाला
आमदार गोविंद गावडे म्हणाले, माशेल कदंब बसस्थानकाचे २०१९ मध्ये उद्घाटन झाले. १ हजार १२० चौरस मीटर जागा पंचायतीची या बसस्थानकासाठी घेतली आहे. कदंब महामंडळ व पंचायत संचालनालयाने सामंजस्य करार केलेला नाही. त्यामुळे पंचायतीचा ८८ हजार रुपये तोटा झाला आहे. तेथील दुकाने भाड्याने दिली नसल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.