Goa Assembly: ज्या डिलिव्हरी बॉईजची बाईक गोव्यात नोंदणीकृत नाही; त्याचीही पडताळणी करा, दिलायला लोबो यांची मागणी; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Assembly Day 6th Political Updates: जाणून घ्या गोव्यातील पावसाळी अधिवेशन, सहाव्या दिवसाच्या महत्वाच्या घडामोडी आणि इतर बातम्या
Delilah Lobo
Delilah LoboDainik Gomantak
Published on
Updated on

ज्या डिलिव्हरी बॉईजची बाईक गोव्यात नोंदणीकृत नाही; त्याचीही पडताळणी करा- दिलायला लोबो यांची मागणी

गोव्यात डिलिव्हरी बॉईज वापरत असलेल्या अनेक दुचाकी राज्यात नोंदणीकृत नाहीत, अशी महत्त्वपूर्ण माहिती आमदार दिलायला लोबो (MLA Delilah Lobo) यांनी दिली. ज्याप्रमाणे भाडेकरुंची (Tenants) पडताळणी केली जाते, त्याच धर्तीवर या डिलिव्हरी रायडर्संची (Delivery Riders) देखील तपासणी केली पाहिजे. एवढचं नाहीतर त्यांची वाहने गोव्यात नोंदणीकृत असावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

"गोव्यातील कंपन्यांमध्ये खासगी कामगार आहेत का?" आमदार प्रेमेंद्र शेट

राज्यात बऱ्याच खासगी कंपन्या आहेत, त्यात गोव्याबाहेरील कामगार काम करतात. याचा अर्थ या कंपन्यांत गोव्यातील कामगार जाऊ इच्छित नाहीत काय, कारण येथील कंपन्या परराज्यातील कर्मचाऱ्यांना अधिक प्राधान्य देतात. जेव्हा या कंपन्यांना परवानगी देताना ते स्थानिक लोकांना कंपनीत काम दिले जाईल, म्हणून लिहिलेही असते. पण त्या नियमाची अंमलबजावणी होत नाही. या कारखान्यांत स्थानिक कर्मचारी किती आहेत, त्याची तपासणी वारंवार व्हायला हवी.

-आमदार प्रेमेंद्र शेट

आमदार जित आरोलकर यांनी योजनांबाबत 3 प्रमुख मागण्या मांडल्या

१. अटल आसरा योजना: फाइलमध्ये किरकोळ त्रुटींमुळे ज्येष्ठ नागरिकांना विलंब होत आहे. आरोलकर: “मूर्ख कारणांसाठी फाइल्स परत करू नका!”

२. कॉमन हाऊस योजना: कौटुंबिक वादांमुळे लाभार्थी घरे बांधू शकत नाहीत. अशा प्रकरणांचे निराकरण करण्यासाठी योजनेत सुधारणा करण्याची आमदारांची मागणी.

३. बेघरांसाठी: आरोलकर यांनी सरकारला बेघरांना निवारा देण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याची विनंती केली.

"केटीसीएल बसेसबद्दल अपडेट देणारी वेबसाइट असावी" आमदार कार्लोस फेरेरा

केटीसीएल बसेसच्या बिघाड किंवा अनुपलब्धतेबद्दल लोकांना अपडेट देणारी वेबसाइट असावी: आमदार कार्लोस फेरेरा

घर ही केवळ एक मूलभूत गरज नाही तर संविधानाने मूलभूत अधिकार आहे

घर ही केवळ एक मूलभूत गरज नाही तर भारतीय संविधानाने हमी दिलेला तो मूलभूत अधिकार आहे. लोकांना सन्मानाने जगण्याची सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी म्हटले आहे.

"बेघर गोवेकरांना शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याची मागणी" आमदार वीरेश बोरकर

विधानसभेत चर्चेत भाग घेताना आमदार वीरेश बोरकर यांनी बेघर गोवेकरांना शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

  • विधानसभा सभागृहात मंत्री, आमदारांकडून एकमेकांवर वैयक्तिक अारोप नको. सभापतींना 'अरे-तुरे' करणे अयोग्य. आमदारांनी सभापतीपदाचा मान राखणे आवश्यक : डॉ. प्रमोद सावंत

  • आधी मुख्यमंत्र्यांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे : युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

  • तिसर्‍या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणावरून केपेचे आमदार आल्टन डिकॉस्ता आक्रमक. कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांनी मुख्यमंत्र्यांचे अाभार मानल्याने उपस्थित केला प्रश्न. मुख्यालय केपेत स्थापन करण्याची मागणी.

  • मुख्यालय कुठे स्थापन करायचे, याचा निर्णय अद्याप झालेला नसल्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्याकडून स्पष्ट.

देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार तयार!

  • कोकणीतून शाळा सुरू करण्याची मागणी ज्या शिक्षण संस्था करतील, त्यांना अनुदान देऊन देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करू. त्यावेळी मराठी शाळा बंद होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

  • नव्या शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) इयत्ता नववीसाठी पुढील वर्षापासून नवे पुस्तक.

"राष्ट्रीय शिक्षण धोरण प्रत्यक्ष उपक्रम आणि प्रकल्प-आधारित शिक्षणावर भर देते" मुख्यमंत्री

राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) प्रत्यक्ष उपक्रम आणि प्रकल्प-आधारित शिक्षणावर भर देते. आनंदी, तणावमुक्त आणि अनुभवात्मक शिक्षण वातावरण सुनिश्चित करताना विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक भार कमी करण्यावर आमचे लक्ष आहे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

‘ग्रीन सेस’ मुद्द्यावर आलेमाओ यांनी केला मुद्दा उपस्थित

विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी आज पुन्हा मुद्दा उपस्थित केला आणि म्हटले की, ४,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यावरील वाद टाळण्यासाठी ग्रीन सेस वसुलीच्या संदर्भात त्यांचा तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्नात बदलला जात आहे. त्यांनी या प्रकरणावर चर्चा करण्याचे आवाहन केले, राज्याच्या तिजोरीचे मोठे नुकसान होत आहे आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे यावर भर दिला.

गोव्याच्या तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय अद्याप निश्चित झालेले नाही: मुख्यमंत्री

काणकोण, केपे, सांगे आणि धारबांदोडा या तालुक्यांचा समावेश असलेल्या गोव्याच्या प्रस्तावित तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय अद्याप निश्चित झालेले नाही. रस्ते जोडणी, जिल्ह्याचे नाव अद्याप चर्चेत आहे: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दाग- फोंडा येथील घराला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास आग

दाग- फोंडा येथील प्रेमानंद नाईक यांच्या घराला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास लागली आग. अंदाजे साडे तीन लाख रुपये पेक्षा अधिक नुकसान. शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा संशय.

दारू पिऊन गाडी चालवणे जीवावर बेतले

वेर्णा जवळ झालेल्या दुचाकी अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रात्री उशिरा दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याने गाडीवर नियंत्रण गमावले आणि अपघात झाला.

गोव्याच्या रस्त्यांवर एकेकाळी विकले जाणारे जंगली मशरूम या हंगामात कुठेही दिसत नाही

गोव्याच्या रस्त्यांवर एकेकाळी विकले जाणारे जंगली मशरूम या हंगामात कुठेही दिसत नाहीत. विषारी प्राणी, त्यांच्याशी संबंधित बंदी आणि पर्यावरणीय इशाऱ्यांमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे विक्री थांबली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com