Goa Electricity Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity: खासगी कंपनीला 'पॉवर' नाहीच, राज्य सरकारकडून स्पष्ट; खात्याकडूनच होणार वीज वितरण

Goa Power Distribution: गोव्यातील वीज वितरण यंत्रणेचा वापर करण्यास कोणत्याही खासगी कंपनीला परवानगी देण्यास गोवा सरकारने रविवारी स्पष्ट नकार दर्शविला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यातील वीज वितरण यंत्रणेचा वापर करण्यास कोणत्याही खासगी कंपनीला परवानगी देण्यास गोवा सरकारने रविवारी स्पष्ट नकार दर्शविला आहे. जोपर्यंत वीजमंत्री म्हणून आपण या पदावर आहोत, तोपर्यंत अशा कोणत्याही हालचालीला सरकारचा विरोध राहील. त्याचबरोबर ग्रामपंचायती व पालिकांनी अशा कोणत्याही कंपनीला ‘ना हरकत दाखला’ देऊ नये, असे आवाहन मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे.

सरकारची कोणतीही परवानगी न घेता एखादी कंपनी थेट पंचायत व पालिकांकडे ना हरकत दाखला मागत असेल, तर ते चुकीचेच आहे. राज्य सरकार कोणत्याही खासगी कंपनीकडे वीज वितरणाची जबाबदारी देणार नाही.

''इलेक्ट्रिसिटी ॲक्ट, २००३'' (विद्युत कायदा, २००३) अंतर्गत संपूर्ण गोव्यासाठी वीज वितरण परवाना मिळवण्यासाठी ‘टाटा पॉवर कंपनी लिमिटेड’ने ‘संयुक्त वीज नियामक आयोग’ (जेईआरसी)कडे मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ढवळीकर यांनी भूमिका मांडली आहे. सध्या गोवा वीज विभाग हाच राज्यातील एकमेव अधिकृत वीज वितरण परवानाधारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

जर एखादी कंपनी गोव्यात येऊन गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते आम्हाला मान्य नाही. सरकार नेहमीच याला विरोध करेल. टाटा पॉवरने वितरण परवाना मिळवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून अनेक ग्रामपंचायतींकडे ''ना हरकत प्रमाणपत्रां''साठी (एनओसी) संपर्क साधला आहे. तथापि, कुडचडेसह काही पंचायतींनी प्रस्तावाबाबत स्पष्टतेचा अभाव असल्याचे कारण देत ही विनंती आधीच फेटाळून लावली.

सरदेसाई यांचा आरोप फेटाळला

टाटा पॉवर राज्य सरकारमार्फत परवाना मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा ‘गोवा फॉरवर्ड पार्टी’चे प्रमुख विजय सरदेसाई यांचा आरोपही ढवळीकर यांनी फेटाळून लावला. ते खरे नाही. त्यांनी ‘ना हरकत प्रमाणपत्रां’साठी पंचायतींशी संपर्क साधला असेल, पण सरकारमार्फत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘टाटा कंपनी’चा दावा

जेईआरसीकडे टाटा पॉवरचा परवाना अर्ज छाननीसाठी प्रलंबित असतानाच मंत्र्यांनी वरील विधाने केली आहेत. दुसरीकडे, टाटा पॉवरने आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की, त्यांना गोवा वीज विभागाचा ताबा घ्यायचा नाही, तर केवळ समांतर वितरण परवानाधारक म्हणून काम करायचे आहे. यामुळे राज्यातील ग्राहकांना वीज पुरवठा करणाऱ्या दोन कंपन्यांपैकी एकाची निवड करण्याचा पर्याय मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT