Goa Water Taxi Dainik Gomantak
गोवा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार वॉटर मेट्रो टॅक्‍सी! प्रवाशांना मिळणार नवा पर्याय, नदीपरिवहन मंत्री सुभाष फळदेसाईंची माहिती

subhash phaldesai goa water metro taxi: वॉटर मेट्रो टॅक्‍सी सेवेस सुरुवात करून राज्‍याच्‍या पर्यटनाला अधिक चालना देण्‍याचे आणि त्‍यातून अधिकाधिक महसूल मिळवण्‍याचे प्रयत्‍न राज्‍य सरकारने सुरू केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: वॉटर मेट्रो टॅक्‍सी सेवेस सुरुवात करून राज्‍याच्‍या पर्यटनाला अधिक चालना देण्‍याचे आणि त्‍यातून अधिकाधिक महसूल मिळवण्‍याचे प्रयत्‍न राज्‍य सरकारने सुरू केले आहे. मुंबईतील ‘मरिटाईम वीक-२०२५’ बैठकीत आमची काही राज्‍यांशी त्‍याबाबतही चर्चा झालेली आहे, अशी माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबईत आयोजित ‘मरिटाईम वीक-२०२५’मध्‍ये काहीच दिवसांपूर्वी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री सुभाष फळदेसाई आणि बंदर कप्‍तान मंत्री दिगंबर कामत यांनी उपस्‍थिती लावली.

या बैठकीत प्रामुख्‍याने जहाज बांधणी प्रकल्‍पाला अधिकाधिक गती देण्‍याच्‍या अनुषंगाने चर्चा झाली. जहाज बांधणी उद्योगात गोवाही सक्रिय असल्‍यामुळे त्‍यासाठी राज्‍याला केंद्राकडून निधी मिळेल.

याआधी राज्‍यातील जेटी तसेच जलवाहतुकीतील साधनसुविधांच्‍या विकासासाठी केंद्र सरकारने राज्‍याला २०० कोटींचा निधी दिलेला आहे.

यापुढे राज्‍यात वॉटर मेट्रो टॅक्‍सी सेवा सुरू करून देश-विदेशातून गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांना गोव्‍यातील सर्वच पर्यटनस्‍थळांचा आस्‍वाद देण्‍याचा निर्णय सरकारने केलेला आहे. या सेवेमुळे राज्‍यातील पर्यटनाला चालना मिळण्‍यासह मोठ्या प्रमाणात महसुलही मिळणार आहे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT