Goa Firing Case: जैतीर-उगवेत रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर गोळीबार, स्थानिक बंदूकधारकांची पोलिसांकडून चाैकशी, 50 मजुरांची झडती

morjim firing case: जैतीर-उगवे येथे रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.
 Goa Firing Case
Goa Firing CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी : जैतीर-उगवे येथे रेती उपसा करणाऱ्या कामगारांवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील रेती व्यवसायाशी संबंधित ५० मजुरांची चौकशी केली आहे.

पोरस्कडे, न्हयबाग, वारखंड, मोपा, उगवे, तोरसे या परिसरात ज्यांच्याकडे बंदुकीचे परवाने आहेत. अशा सर्वांनी आपल्या बंदुका पेडणे पोलिस स्टेशनमध्ये आणून पोलिसांना सविस्तर माहिती द्यावी, असा आदेशही देण्यात आलेला आहे. या सर्वांची पोलिस चाैकशी करीत आहेत.

 Goa Firing Case
Goa Rain: ऐन ऑक्टोबरमध्ये राज्य 'ओलेचिंब'! महिन्यात आतापर्यंत 11.82 इंच नोंद; अनेक ठिकाणी पडझड, रस्त्यांवर पाणी

रेती उपसा करणाऱ्या दोन कामगारांवर सोमवारी मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. बंदुकीच्या गोळ्या लागून लालबहादूर गोंड (मूळ बिहार) हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली तसेच रमेश पासवान याचीही प्रकृती सुधारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गोळी लागलेल्या दोन्ही मजुरांच्या शरीरात गोळी न मिळाल्याने हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक कुठल्या प्रकारची होती हे सिद्ध करणे कठीण झाले आहे तसेच हा ंप्रकार रात्रीच्या वेळी घडल्याने हल्लेखोराने कुठल्या दिशेने हल्ला केला याचा अंदाज लावणेही पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले आहे.

 Goa Firing Case
Dawood Associate Arrested In Goa: मोठी बातमी! दाऊदच्या जवळच्या माणसाला गोव्यात अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

आम्ही आतापर्यंत ५० हून अधिक मजुरांना तसेच रेती व्यावसायिकांना पेडणे पोलिस स्टेशनवर बोलावून त्यांची चौकशी केली आहे. धागेदोरे सापडल्यानंतर मुख्य संशयितांना पकडले जाईल. तेरेखोल आणि शापोरा नदी किनारी भागातील ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त बंदुका आहेत. त्या सर्वांना चाैकशीसाठी बोलविण्यात आले आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास केला जात आहे.

- सचिन लोकरे, पोलिस निरीक्षक, पेडणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com