Illegal Gas Cylinder Dainik Gomantak
गोवा

Illegal Gas Cylinder: 11 हजार लोक घेत होते बेकायदा गॅस सिलिंडर, राज्य सरकारकडून आकडेवारी जारी

11000 Illegal Gas Cylinders Goa: घरगुती गॅस सिलिंडरची कमतरता भासू लागल्यानंतर राज्यात तब्बल ११ हजार जणांनी नव्याने पाच किलो वजनाचे सिलिंडर विकत घेतले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: घरगुती गॅस सिलिंडरची कमतरता भासू लागल्यानंतर राज्यात तब्बल ११ हजार जणांनी नव्याने पाच किलो वजनाचे सिलिंडर विकत घेतले आहेत. याचा सरळ अर्थ आजवर काळ्या बाजारातून हे लोक गॅस सिलिंडर वापरासाठी घेत होते, असा होतो.

आजवर ११ हजार जणांनी तसे सिलिंडर विकत घेतल्याची आकडेवारी सरकारनेच जारी केली आहे. सिलिंडरचा काळाबाजार होतो, हे सरकारी यंत्रणेने मान्य केले आहे. सिलिंडरचा तुटवडा भासू लागल्यानंतर आजवर तब्बल ४५० छापे टाकून प्रत्येक प्रकरणात दंडात्मक कारवाई केल्याचेही सरकारनेच उघड केले आहे.

मागणी घटली

नागरी पुरवठा संचालक संजीव गडकर यांनी सांगितले, की राज्यातील व्यावसायिक वापराचे सिलिंडर मागणीच्या ६० टक्के एवढे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दिले जातात. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची दैनंदिन मागणी घटली आहे.

आखाती युद्धपूर्व काळात दररोज ११ हजार ४१२ गॅस सिलिंडरचे बुकिंग होत होते. त्यानंतर सिलिंडरची तूट निर्माण होईल, या भीतीने मागणी वाढून ती दररोज १३ हजार ३७ सिलिंडरपर्यंत पोचली. आता तीच मागणी ८ हजार ९५२ वर खाली आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT