Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Vaibhav Sooryavanshi team india debut record: अवघ्या 15 वर्षांच्या या नवोदित खेळाडूची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासोबतच आगामी आशियाई गेम्स 2026 साठी भारतीय संघात निवड करण्यात आली.
Sachin Tendulakr & Vaibhav Sooryavanshi
Sachin Tendulakr & Vaibhav SooryavanshiDainik Gomantak
Published on
Updated on

Vaibhav Sooryavanshi team india debut record: आयपीएल 2026 च्या हंगामात आपल्या अफाट आणि धडाकेबाज कामगिरीने संपूर्ण क्रिकेट विश्वाला थक्क करणाऱ्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीची अखेर भारतीय संघात एन्ट्री झाली. अवघ्या 15 वर्षांच्या या नवोदित खेळाडूची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासोबतच आगामी आशियाई गेम्स 2026 (Asian Games 2026) साठी भारतीय संघात निवड करण्यात आली. निवड समितीच्या या धाडसी निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.

आता जर वैभवला आयर्लंडविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत अंतिम अकरामध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, तर तो भारतीय क्रिकेट इतिहासात एका नव्या सुवर्ण अक्षरांनी कीर्तिमान रचेल आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) तब्बल 37 वर्षे जुना ऐतिहासिक विक्रम मोडीत काढेल.

Sachin Tendulakr & Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi: सामना लॉर्ड्सवर, पण चर्चा भारताच्या वैभवची! युवा खेळाडूच्या धडाकेबाज कामगिरीची होतेय चर्चा Watch Video

भारतासाठी (India) आतापर्यंत सर्वात तरुण वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर नोंदवला गेला. सचिनने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अवघ्या 16 वर्षे आणि 205 दिवस वयाचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. गेल्या 37 वर्षांत एकही भारतीय खेळाडू इतक्या कमी वयात भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू शकलेला नाही. मात्र, आता 'बिहारचा लाल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीकडे हा महाविक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी आहे.

येत्या 26 जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे, आणि त्यावेळी वैभवचे वय अवघे 15 वर्षे आणि 91 दिवस इतके असेल. त्यामुळे या मालिकेत मैदानात उतरताच तो सचिनला मागे टाकत भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनेल.

Sachin Tendulakr & Vaibhav Sooryavanshi
Sachin Tendulkar On Vaibhav Sooryavanshi: 'घाई करू नका...' 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट डेब्युबाबत सचिन तेंडुलकर असं का म्हणाला?

बिहारच्या समस्तीपूरचा रहिवासी असलेल्या वैभव सूर्यवंशीने आयीपीएल 2026 मध्ये आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने 16 सामन्यांमध्ये 237.30 च्या अद्भूत आणि स्फोटक स्ट्राईक रेटने तब्बल 776 धावा कुटल्या, ज्यामध्ये एक धडाकेबाज शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत त्याची कामगिरी कमालीची राहिली आणि त्याने आपल्या संघाला अनेक सामने स्वबळावर जिंकवून दिले.

Sachin Tendulakr & Vaibhav Sooryavanshi
Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

त्याची आक्रमक फलंदाजी, मैदानावरील निर्भीड अंदाज आणि मोठ्या सामन्यांमध्ये दडपण न घेता खेळण्याची अफाट क्षमता पाहून निवडकर्ते प्रचंड प्रभावित झाले. याच कारणामुळे इतक्या लहान वयात त्याला थेट भारतीय सीनियर संघात खेळण्याची मोठी संधी देण्यात आली. आता अवघ्या जगाचे लक्ष वैभवच्या या ऐतिहासिक पदार्पणाकडे लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com