Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Woman Dangerous Stunt In Moving Train: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले आहे.
Woman Dangerous Stunt In Moving Train
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Woman Dangerous Stunt In Moving Train: आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनले. त्यातही सध्या लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्याच डोक्यावर 'रील' (Reels) बनवण्याचे भूत स्वार झाल्याचे पाहायला मिळत आहे. रील बनवून स्वतःची कला सादर करणे किंवा प्रसिद्धी मिळवणे यात काहीच गैर नाही, उलट अनेकांनी या माध्यमातून मोठी लोकप्रियताही मिळवली. मात्र, काही लोकांच्या डोक्यातील हे रीलचे वेड इतक्या थराला जाते की, त्यासाठी ते स्वतःच्या प्राणाचीही पर्वा करत नाहीत.

केवळ काही लाईक्स आणि व्ह्यूजसाठी थेट मृत्यूशी खेळणाऱ्या अशा स्टंटबाजांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. सध्या असाच एक थक्क करणारा आणि तितकाच संतापजनक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एका प्रौढ महिलेचा अत्यंत निष्काळजीपणा आणि मूर्खपणा कॅमेऱ्यात कैद झाला.

Woman Dangerous Stunt In Moving Train
Viral Video: जवळ गेला, पायाला स्पर्श केला अन्...; मनालीत टवाळखोरांकडून परदेशी तरुणीची छेडछाड; संतापजनक प्रकार CCTV मध्ये कैद

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक साडी नेसलेली महिला चालत्या ट्रेनच्या दरवाजावर उभी असल्याचे दिसून येते. ती ट्रेनच्या दरवाजाचे दोन्ही बाजूचे हँडल पकडून थोडी बाहेरच्या बाजूला झुकलेली असते. व्हिडिओ सुरु होताच, ती चित्रीकरण करणाऱ्या व्यक्तीला मोठ्या उत्साहात 'रोल कॅमेरा ॲक्शन' असे म्हणताना ऐकू येते. यानंतर, ही महिला चालत्या ट्रेनच्या दारातून अत्यंत बेफिकीरपणे म्हणते, 'अरे मी ट्रेनमध्ये व्हिडिओ बनवला तर कोणी काही बोलेल का?' आपला हा स्टंट पूर्ण केल्यानंतर ती पुन्हा ट्रेनच्या आत येते.

तिचा हा जीवघेणा स्टंट पाहून ट्रेनमधील इतर प्रवासी आणि नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. कोणत्याही सुरक्षेशिवाय आणि चालत्या ट्रेनमधून असा स्टंट करणे किती धोकादायक ठरु शकते, याचे भान या महिलेला राहिलेले दिसत नाही.

Woman Dangerous Stunt In Moving Train
Pregnant Woman Viral Video: 9 महिन्यांची प्रेग्नन्सी आणि चक्रासन! महिलेचा थक्क करणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

हा धक्कादायक व्हिडिओ 'एक्स'वर @ChapraZila नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ पोस्ट करताना युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अशा लोकांसोबत काही दुर्घटना घडली, तरी काही फरक पडणार नाही.' हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच काही वेळातच हजारो लोकांनी तो पाहिला असून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले, 'ही महिला ट्रेनबाहेर झुलत आहे आणि इथे आम्हाला भीती वाटत आहे.'

Woman Dangerous Stunt In Moving Train
Viral Video: अजब थरार! स्कूटीच्या धडकेत हत्तीचा दातच तुटला, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, ''आता हत्तीही सुरक्षित नाहीत''

तर दुसऱ्या एका युझरने लिहिले, 'हा निव्वळ सोशल मीडियाचे भूत आहे, ज्याने लोकांना वेड लावले आहे.' या व्हिडिओमुळे चालत्या ट्रेनमध्ये स्टंट करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी आता पुन्हा एकदा जोर धरु लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com