New Medical College Dainik Gomantak
गोवा

New Medical College: गोव्यात नवे मेडिकल कॉलेज; 50 एमबीबीएस जागांना केंद्राची मंजुरी, निम्म्या जागा गोमंतकीयांसाठी

Goa New Medical College Approval 2027 28: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी ही माहिती दिली. हे महाविद्यालय कुंकळ्ळी येथे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून ५० एमबीबीएस जागांसह महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी ही माहिती दिली. हे महाविद्यालय कुंकळ्ळी येथे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच पार्श्वभूमीवर सरकारने बंद पडलेले नुसी वॉकहार्ट रुग्णालय ताब्यात घेतले आहे. नव्या महाविद्यालयातील एकूण ५० जागांपैकी निम्म्या जागा गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. या मंजुरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचे आभार मानले.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गोव्यासाठी ही आनंदाची बातमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा प्रकल्प पूर्णपणे केंद्र सरकारच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. गोमंतकीय विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातील सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

या महाविद्यालयामुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढणार असून, स्थानिक विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रवेशाचे निकष, आरक्षणाचे तपशील आणि विनामूल्य सुविधांबाबतचे अधिकृत नियम जाहीर झाल्यानंतरच या घोषणेचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल.

दरम्यान, कुंकळ्ळीत हे महाविद्यालय सुरू झाल्यास दक्षिण गोव्यात वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा ठरेल. सध्या दक्षिण गोव्यातील रुग्णांना अनेकदा पुढील उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयावर अवलंबून राहावे लागते. नव्या महाविद्यालयासोबत आवश्यक आरोग्य सुविधा विकसित झाल्यास दक्षिण गोव्यातील रुग्णसेवेलाही त्याचा लाभ होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: गोव्यातील व्हिलांमधून 900 कोटींचे कथित सायबर रॅकेट! मुंबई पोलिसांची कारवाई; 22 जणांना अटक

Goa Liberation Day: मुक्तिदिनापूर्वी सर्व मुंडकार प्रकरणे निकाली काढणार! CM सावंतांची घोषणा; रवी नाईक यांच्या वारसदाराबाबत मौन

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT