Laxmikant Parsekar Dainik Gomantak
गोवा

Laxmikant Parsekar ...जेव्हा आंदोलनकर्त्या नर्सेसबाबत गोव्याच्या माजी CM नं केलं होतं वादग्रस्त वक्तव्य; काय होती ती 9 वर्षापूर्वीची घटना?

Goa Former CM Laxmikant Parsekar: सुमारे नऊ वर्षांपूर्वी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी परिचारिकांच्या (नर्स) आंदोलनाबाबत अजब वक्तव्य केले होते.

Manish Jadhav

#RespectWomen: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. गोव्यातही भाजपने आपली जय्यत तयारी सुरु केली आहे. राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढाई पाहायला मिळणार आहे. राज्यातील दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दरम्यान, निवडणुकीच्या काळात महिलांचा सन्मान हाही मोठा मुद्दा बनत आहे. महिलांच्या सन्मानाबद्दल का बोललं जातंय हे आम्ही सांगू, पण त्याआधी हे जाणून घ्या की, काँग्रेस पुन्हा एकदा महिलांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरुन घेरलेली दिसत आहे. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मथुरेतून भाजप खासदार हेमा मालिनी यांच्याबाबत केलेले वक्तव्य.

काय म्हणाले रणदीप सुरजेवाला?

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचा अश्लील कमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते हेमा मालिनी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसले होते. सुरजेवाला म्हणाले की, "लोक आमदार-खासदार का बनतात, जेणेकरुन त्यांचे कोणीतरी ऐकेल? कोणी हेमा मालिनी तर नाही, ज्याला तुम्ही ****** बनवता." पुढे ते म्हणाले की, 'आम्ही हेमा मालिनी यांचाही खूप आदर करतो.' मात्र, भाजपने सुरजेवाला यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत काँग्रेसवर महिलांचा अपमान केल्याचा आरोप केला होता.

दुसरीकडे मात्र हेही लक्षात घेण्यासारखे आहे की, एखाद्या नेत्याने महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. महिलांबाबत जाहीरपणे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अशा नेत्यांची यादी मोठी आहे. असेच एक नाव आहे लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे. चला तर मग गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी महिलांबाबत काय वक्तव्य केले होते तेही येथे जाणून घेऊया...

लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे अजब वक्तव्य

दरम्यान, सुमारे नऊ वर्षांपूर्वी गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी परिचारिकांच्या (नर्स) आंदोलनाबाबत अजब वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन राज्यात बराच वादंग निर्माण झाला होता. जेव्हा आंदोलक परिचारिका पार्सेकर यांना भेटायला पोहोचल्या होत्या, तेव्हा ते म्हणाले होते की, 'उन्हात आंदोलन केल्याने तुम्ही काळ्या पडाल. लग्नाच्या वेळी तुम्हाला चांगला वर मिळणार नाही.' मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर परिचारिकांनी पार्सेकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रसार माध्यमांना सांगितले होते.

परिचारिकांनी काय सांगितले

या आंदोलनात सहभागी असलेल्या परिचारिकांपैकी एक अनुषा सावंत यांनी सांगितले होते की, "जेव्हा आम्ही आमच्या मागण्यांसह मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितले की, मुलींनी उन्हात आंदोलन करण्यासाठी बसू नये, त्यामुळे तुम्ही काळ्या पडाल. असे झाले तर लग्नाच्या वेळी चांगला वर मिळणार नाही.'' या वक्तव्याबाबत परिचारकांच्या वतीने सांगण्यात आले की, मुख्यमंत्र्यांकडून असे वक्तव्य आम्हाला अपेक्षित नव्हते. आम्हाला वाटले की, मुख्यमंत्र्यांना आमच्या मागण्यांविषयी माहिती असेल म्हणून त्यांना आम्हाला भेटायचे आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने नकार दिला होता

मात्र, हा वाद वाढल्यावर मुख्यमंत्री कार्यालयातील एका अधिकाऱ्याने या मुद्द्याबाबत सांगितले होते की, "असे कोणतेही वक्तव्य केल्याचे आम्हाला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारचे कोणतेही वक्तव्य केले नाही."

या वक्तव्याने राजकीय वादंग

दरम्यान, हे प्रकरण 2015 मधील आहे, गोव्यातील रुग्णवाहिका 108 सेवेशी संबंधित परिचारिका आणि कर्मचारी आंदोलन करत होते. यासंदर्भात आंदोलकांनी तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेतली, त्यानंतर त्यांनी परिचारिकांबाबत केलेले वक्तव्य राजकीय वादंगाचे कारण बनले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT