CM Pramod Sawant: निवडणूकीत उतरणाऱ्या कॉग्रेस पक्षाला नेतृत्वच नाही; मुख्यमंत्री सावंत

CM Pramod Sawant: निवडणूकीत उतरणाऱ्या कॉग्रेस पक्षाला नेतृत्वच नाही. कोणाला उमेदवारी द्यायची यावर एक वाक्यता नाही हा पक्ष आता गलीतगात्र होऊन नेतृत्वहीन बनलेला आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant:

निवडणूकीत उतरणाऱ्या कॉग्रेस पक्षाला नेतृत्वच नाही. कोणाला उमेदवारी द्यायची यावर एक वाक्यता नाही हा पक्ष आता गलीतगात्र होऊन नेतृत्वहीन बनलेला आहे. मागच्या पाचवर्षात दक्षिण गोव्याचे खासदार कोण हेच कोणाला माहीत नाही ते मतदारसंघात कधीच फिरकले नाहीत असे विधान गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाने राज्य आणि देश विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर पं. मोदी पुढील पाच वर्षासाठी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनून विकसित भारताचे स्वप्न पूर्णत्वास नेणार आहेत.

बाजार शिरोडा येथील शिरोडा गणेशोत्सव मंडळ सभागृहात आयोजित केलेल्या लोकसभा निवडणूकीतील दक्षिण गोवा मतदारसंघाच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

CM Pramod Sawant
Goa Private Bus: खासगी बस तिकीट दरावर नियंत्रण आणा!

डॉ. सावंत म्हणाले की झुवारी नदीवर बोरी येथे नवा पुल उभारण्यासाठीच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. बेतोडा बोरी लोटली पर्यंत फोर लाईन रस्ता या नव्या पुलाला जोडून मडगाव, वास्को, पणजी हे अंतर खुपच कमी होणार आहे.मोदीच्या या यशस्वी कारकीर्दीतील उथळ इंजिन सरकारने सर्व सामान्य नागरिकांना सर्व तऱ्हेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या व

प्रत्येकाच्या घरापर्यंत या योजना पोचवल्या सर्वसामान्य नागरिकांनी पाच वर्षे मोफत धान्य देण्याचे मोठे काय मोदी सरकारने केले आहे. याविरूध्द कॉग्रेसने कोणत्या योजना लोकाना दिल्या त्या सांगा असे असे डॉ. सावंत यांनी सांगून कमळाचे सरकार हे सर्व सामान्यांचे सरकार आहे.

CM Pramod Sawant
Goa Congress Internal Politics: गोवा काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण, इच्छुकांची मांदीयाळी

गेल्या पाच वर्षात 35000 कोटी रू. खर्चून राज्याचा सर्वांगीण विकास साधला सूसज्ज हॉस्पिटल भाजपनेच तयार करून जनतेच्या आरोग्याची काळजी वाहिली असेही डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगून राजकारणातून लोक सेवा ह्या केंद्रसरकारच्या योजना लोकापर्यंत पोचवल्या जात आहेत. दक्षिण गोव्यातील भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांना प्रचंड मताधिक्यांनी निवडून द्या तुमची सर्व कामे करण्यास या तत्पर आहेत असे डॉ. सावंत म्हणाले..

पल्लवी धेंपे म्हणाल्या की ज्या मंडपात ही माझी पहिली सभा होते आहे त्या पवित्र गणपती मंडपाचे पक्क्या स्वरुपाचे बांधकाम मी निवडून आल्यावर खासदारनिधीतून करून घेणार असे टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. राज्यातील नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मी आपल्यासमोर खासदाराच्या निवडणूकीस उभी आहे. तुमचा पूर्ण पाठिंबा मला मिळणार आहे.

शिवाय देवी कामाक्षीचे आशीर्वादही आमच्या पाठीशी आहेत असे त्या म्हणाल्या. नारीशक्ती युवा शक्तीच्या जोरावर देशाची प्रगती होत आहे. राज्यात महिलावर्गासाठी 33 टक्के आरक्षण करणाऱ्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांनी अभिनंदन करून खासदार बनल्यावर जनतेचे प्रश्‍न सोडवण्यास आपण तत्पर राहणार असल्याचे धेंपे म्हणाल्या.

मंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की शिरोडा मतदारसंघात विक्रमी मते देऊन आम्ही पल्लवी धेंपे यांना विजयी करून देणार आहोत. मतदारसंघातील 45 बुथ आणि पूर्ण मतदारसंघातील तळागाळातील नागरिकांपर्यंत जाऊन प्रचार केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करून तिसऱ्या वेळी पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही गोव्यातून भाजपचे दोन खासदार देणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती ओळखून पल्लवी धेंपे यांना उमेदवारी देऊन नारीशक्तीचा गौरव केला आहे. असे ते म्हणाले. येत्या ७ जूनला सर्व मतदारांनी कमळाला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सरपंच मुग्धा शिरोडकर यांचे पल्लवी धेंपे यांना मते द्या म्हणून सांगणारे भाषण झाले. शिरोडा भाजप मंडळचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी स्वागत केले. मुग्धा शिरोडकर, भारती शिरोडकर, रेश्‍मा नाईक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ अर्पून स्वागत केले. डॉ. गौरी शिरोडकर यांनी सूत्रंसचालन केले तर जि.प. सदस्य नारायण कामत यांनी आभार मानले. या सभेला मतदारसंघातील बरेच भाजप कार्यकर्त्या महिला पुरुष उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com