Fishing regulations in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Fishing: 'गोव्यात घुसलेल्या बेकायदेशीर बोटी आम्ही पकडल्या, आमच्या सुरक्षेचे काय? आमचा संयम संपतोय!' मच्छीमारांचा इशारा

Fishermens In Goa: बोट कधी येणार आणि आम्हाला सुरळीत व्यवसाय कधी करता येईल, याचे उत्तर नाही. आता आमचा संयम संपत चालला आहे, असा इशारा मच्छीमार संघटनेने दिला आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील मच्छीमारांना राज्य सरकार व मत्स्यसंपदा विभागाचा अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याचा गंभीर आरोप ‘गोयचो रापोणकरांचो एकवट’ संघटनेने केला आहे. संघटनेचे सरचिटणीस ओलान्सियो सिमॉइस यांनी सांगितले की, गोव्यात बेकायदेशीरपणे घुसून मासेमारी करणाऱ्या बोटी आम्ही पकडून दिल्या, याला तीन महिने झालेत. मात्र, राज्य सरकारने आमच्या सुरक्षेसाठी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही.

मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी बेकायदेशीर मासेमारीसाठी दंडवाढीचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत हे निर्णय प्रत्यक्षात अमलात आलेले नाहीत. आम्ही लवकरच मंत्र्यांना भेटून निवेदनाद्वारे आमच्या मागण्यांची पुनरावृत्ती करणार आहोत, असे ओलान्सियो यांनी सांगितले.

गोव्याच्या सीमेजवळ मालपे येथून बोटी येत आहेत. मात्र, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारच्या पथकाकडे एकही बोट नाही. ही बोट कधी येणार आणि आम्हाला सुरळीत व्यवसाय कधी करता येईल, याचे उत्तर नाही. आता आमचा संयम संपत चालला आहे, असा इशारा मच्छीमार संघटनेने दिला आहे.

मच्छीमारांचा संयम ताणला जात असून, सरकारने अंत पाहू नये, असा रोखठोक इशारा संघटनेने दिला आहे. आमचे केवळ आश्वासनांवर समाधान नाही. सरकारने ठोस कृती करावी, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा ओलान्सियो यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चंदेरी दुनियेत मंत्री तवडकरांची एन्ट्री! 'उलगुलान' चित्रपटात साकारली 'मुखिया'ची भूमिका; फोटोवरून चर्चा

Leopard Cub Rescued: आधी वाटले कुत्र्याचे पिल्लू, नंतर निघाला बिबट्याचा बछडा; खांडेपार येथील घटना, Watch Video

Chorao Ro Ro Ferry Pass: चोडणवासीयांना 'रो-रो फेरी' महागली! प्रतिट्रीप 5 रुपयांची वाढ; पास होणार वितरित

Chimbel Viral Video: चिंबल येथील पंचसदस्याच्या व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ! CM सावंतांचे वेधले लक्ष; ग्रामसभेत होणार चर्चा

Goa Live News: गोंयात कोळसो नाका!

SCROLL FOR NEXT