Fraud Case Dainik Gomantak
गोवा

5 लाखांच्या फसवणूक प्रकरणात नवा ट्विस्ट; तक्रारदार म्हणतो, 'परेरा यांच्याविरोधात माझी तक्रार नाही'; मिकी पाशेको यांच्या सांगण्यावरुन तक्रार केल्याचा कोर्टात दावा

Fidol Pereira Fraud Case: सामाजिक व पर्यावरण कार्यकर्त्या फिडोल परेरा यांच्याविरोधात दाखल पाच लाख रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप दक्षिण गोवा सत्र न्यायालयात करण्यात आला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: सामाजिक व पर्यावरण कार्यकर्त्या फिडोल परेरा यांच्याविरोधात दाखल पाच लाख रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप दक्षिण गोवा सत्र न्यायालयात करण्यात आला. माजी मंत्री मिकी पाशेको यांच्या सांगण्यावरून ही तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा परेरा यांच्यावतीने करण्यात आला.

कोलवा येथील बाशासाब सिद्धापूर यांनी परेरा यांनी जहाजावर नोकरी देण्याचे आश्वासन देऊन पाच लाख रुपये घेतल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर परेरा यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. अटकेच्या शक्यतेने परेरा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून, शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी तक्रारदार सिद्धापूर यांनी हस्तक्षेप याचिका दाखल करून परेरा यांनी आपली कोणतीही फसवणूक केली नसल्याचे आणि त्यांच्याविरोधात आपली तक्रार नसल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पुढील सुनावणी २७ ऑक्टोबर रोजी होणार असून, तपास अधिकाऱ्यांना बाजू मांडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

परेरा यांच्यावतीने ॲड. अमेय प्रभूदेसाई यांनी युक्तिवाद करताना, मिकी पाशेको यांनी व्यावसायिक मित्र मॅथ्यू दिनीज यांच्या माध्यमातून ही खोटी तक्रार दाखल करवून घेतल्याचा आरोप केला. दिनीज यांनी परेरा यांच्याकडून घेतलेल्या दहा लाख रुपयांपैकी तीन लाख रुपये सिद्धापूर यांच्या खात्यातून परत केले होते. या व्यवहाराचे पुरावे उपलब्ध असल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले.

याचिकेत म्हटले आहे...

सिद्धापूर यांनी याचिकेत म्हटले आहे की, ते पूर्वी दिनीज यांच्याकडे कामाला होते. दिनीज यांनीच त्यांना कोलवा पोलिस ठाण्यात बोलावले होते. आपल्या खात्यातून परेरा यांना पाठवलेली रक्कम दिनीज यांच्या सांगण्यावरून पाठवली होती. परेरा यांनी आपली फसवणूक केलेली नसल्याने हे प्रकरण पुढे चालवण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Illegal Businesses: 'आम्हालाही मोकळा श्वास घेऊ द्या!' कळंगुटवासीयांचा संताप; बेकायदा व्यवसायांवर कारवाईचे पर्यटनमंत्र्यांचे आश्वासन

PM Kisan 24th Installment Date: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट! 30 ऑक्टोबरला खात्यात जमा होणार 24वा हप्ता; चेक करा तुमचे स्टेटस

खरी कुजबुज: काँग्रेस नेते फॉरेनला?

Mumbai Indians New Head Coach: 'पॉली' आता मुंबई इंडियन्सचा मास्टरमाइंड! खेळाडू म्हणून गाजल्यानंतर आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार किरॉन पोलार्ड

VIDEO: समूद्र खवळला! उंचच उंच लाटा, रस्त्यांवर कोसळली झाडे; तैवानमध्ये 'चांपी' वादळाचा कहर! 500 हून अधिक जखमी, 1.67 लाख घरांचा वीजपुरवठा खंडित

SCROLL FOR NEXT