Goa Politics: पार्सेकरांची भाजपमध्ये लवकरच घरवापसी? उत्पल पर्रीकरही पुनर्प्रवेशाच्या विचारात; मांद्रे-पणजीच्या राजकीय समीकरणांची चर्चा

Goa BJP Assembly Elections: भाजपपासून दुरावलेल्या; पण अद्यापही भाजपची विचारधारा मानणारे नेते, कार्यकर्त्यांसाठी भाजपने आपली कवाडे खुली केली आहेत.
Goa BJP Assembly Elections
Goa PoliticsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भाजपपासून दुरावलेल्या; पण अद्यापही भाजपची विचारधारा मानणारे नेते, कार्यकर्त्यांसाठी भाजपने आपली कवाडे खुली केली आहेत. त्यानुसार माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा अल्पावधीत भाजप फेरप्रवेश होऊ शकतो, तर उत्पल पर्रीकर हेही भाजप प्रवेशाचा विचार करू शकतात.

भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव शिवप्रसाद यांची माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी आज घेतलेल्या भेटींमुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. पार्सेकर २७ रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये फेरप्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Goa BJP Assembly Elections
Leopard Cat Goa: छोट्याशा तळ्याने जंगलातील दुर्मीळ पाहुण्याला आणले कॅमेऱ्यासमोर; गोव्यात बिबटमांजराचे प्रथमच चित्रीकरण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षापासून दूर गेलेल्या नेत्यांना पुन्हा जवळ आणण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना या भेटींमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही पार्सेकर यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता नाकारलेली नाही.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनीही शिवप्रसाद यांची भेट घेतली. या भेटीविषयी राणे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही बैठक राजकीय स्वरूपाची असल्याचे स्पष्ट केले. राजकारणाशी संबंधित सर्व पैलूंवर चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी अधिक तपशील देणे टाळले. त्यामुळे या बैठकांमधून पक्षांतर्गत पुनर्रचना, उमेदवारी आणि आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत काही हालचाली सुरू आहेत का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पक्षापासून दुरावलेल्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दामू नाईक यांनी सांगितले. पार्सेकर यांची मी सहावेळा भेट घेतली असून त्यांच्याशी त्यापेक्षा दुप्पट वेळा दूरध्वनीवरून चर्चा केल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजपची विचारधारा मानणारे जुने नेते आणि कार्यकर्ते पुन्हा एकत्र यावेत, अशी पक्षाची भूमिका असून त्यानुसार येत्या काही दिवसांत पावले उचलली जातील, असे संकेत त्यांनी दिले.

उमेदवारी नाकारल्यानंतर पार्सेकर यांनी भाजप सोडून मांद्रे मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्याचप्रमाणे उत्पल पर्रीकर यांनी भाजपची उमेदवारी न मिळाल्याने पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. आता या दोघांच्या भाजपशी पुन्हा जुळणाऱ्या संबंधांमुळे आगामी निवडणुकीतील उमेदवारीचे गणित चर्चेत आले आहे.

पार्सेकर भाजपमध्ये परतल्यास मांद्रेत विद्यमान मगो आमदार जीत आरोलकर यांच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पणजीत भाजपचे विद्यमान आमदार तथा महसूलमंत्री बाबू मोन्सेरात यांचे स्थानही चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. उत्पल यांच्या संभाव्य पुनरागमनाच्या पार्श्वभूमीवर मोन्सेरात यांना अन्य मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, याबाबत भाजपकडून कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

Goa BJP Assembly Elections
Goa Cricket News: गोव्याचा मोसमातील पहिला विजय! कर्नल नायडू करंडकात बिहारला 174 धावांनी धूळ चारली

दोन मतदारसंघ, अनेक प्रश्न

१ मांद्रे : लक्ष्मीकांत पार्सेकर भाजपमध्ये परतल्यास विद्यमान मगो आमदार जीत आरोलकर यांच्या उमेदवारीबाबत पक्ष काय भूमिका घेणार, याकडे लक्ष असेल.

२ पणजी : उत्पल पर्रीकर यांचे भाजपमध्ये पुनरागमन झाल्यास विद्यमान आमदार बाबू मोन्सेरात यांच्या उमेदवारीचे काय होणार, हा प्रश्न चर्चेत आहे.

३ पक्षांतर्गत एकजूट : दुरावलेल्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्याच्या प्रयत्नांतून भाजप आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक एकजुटीवर भर देत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, अंतिम उमेदवारीचे चित्र पक्षाच्या अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com