Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: अमली पदार्थांचा विळखा कायम! पाच वर्षांत अमली पदार्थ सेवनाची 'एवढी' प्रकरणे

आरोग्य विभागाकडे नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Monsoon Session गोव्याच्या आरोग्य विभागाने २०१९ पासून यावर्षी ३० जूनपर्यंत राज्यात दारूच्या व्यसनाची १,८७५ आणि अमली पदार्थ सेवनाची २८५ प्रकरणे नोंदवली आहेत. यातून केवळ ८४४ मद्यसेवन आणि १२१ अमली पदार्थ सेवन प्रकरणे उपचारासाठी दाखल झाली आहेत.

गुरुवारी (ता.५) फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना २०१९ पासून आजपर्यंत गोव्यातील ड्रग्स आणि दारू व्यसनाधीनांच्या स्थितीबाबत अतारांकित प्रश्न विचारला.

या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी आपल्या उत्तरात सांगितले की, २०१९ पासून ३० जून २०२३ पर्यंत एकूण १८७५ मद्यसेवन प्रकरणे आणि २८५ अमली पदार्थ सेवनाची प्रकरणे आरोग्य विभागाकडे नोंदवण्यात आली आहेत. यापैकी केवळ ८४४ मद्य सेवन आणि १२१ ड्रग्स सेवन प्रकरणे वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आली.

सरदेसाई यांच्या त्यानंतरच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी खुलासा केला की, आयपीएचबीमधील नवीन २०० खाटांच्या हॉस्पिटलच्या दुसऱ्या टप्प्यात ३३ खाटांचा व्यसनमुक्तीसाठी वॉर्ड सुरू करण्याची विभागाची योजना आहे.

मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था (आयपीएचबी) दारू आणि ड्रग्सच्या व्यसनाच्या समस्येने ग्रस्त लोकांना समुपदेशन आणि उपचार प्रदान करते.

५,८६३ व्यसनाधीन व्यक्ती आहेत ज्यांना आरोग्य विभागाकडून उपचार आणि समुपदेशन करता आले. जानेवारी २०१९ पासून ५,६०९ व्यसनाधीन आहेत ज्यांचे पुनर्वसन, उपचार, डिटॉक्सिफिकेशन चालू आहे. - विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT