Valpoi News: वाळपई सत्तरीत भटक्या गाईचा मृत्यू; पोटातून डॉक्टरांनी काढले तब्बल 30 किलो प्लास्टिक

नाणूस गोशाळेत चिकित्सा
Valpoi News
Valpoi NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Valpoi News: नुकत्याच सत्तरीतील एका भटक्या गाईचा मृत्यू झाला. या गाईच्या मृत्यूचे कारण शोधताना डॉक्टरांना शवचिकित्सेवेळी तिच्या पोटातून सुमारे ३० किलो प्लॅस्टिक आढळून आले. हे प्लॅस्टिक डॉक्टरांनी बाहेर काढले आहे.

वाळपईसह सत्तरीतील अनेक भागात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढतच चालला आहे. या भटक्या जनावरांमुळे सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाची दखल दखल घेण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

Valpoi News
Goa Flight Rate: लॉंग विकेंडच्या पार्श्वभूमीवर गोव्यात येण्यासाठी विमान भाडे झाले दुप्पट; बसप्रवासही महागला

जसा या भटक्या जनावरांमुळे सर्वसामान्यांना त्रास होत असतो तसेच कचरा कोंड्याळ्यात वा इतस्ततः काहीही खात असल्याने त्यातून पोटात प्लॅस्टिक गेल्याने हा भटक्या जनावरांनाही त्रास होतो.

वाळपई सत्तरी भागात ही भटकी जनावरे अनेक अपघाताला कारणीभूत ठरली आहेत. ही जनावरे शेतकऱ्यांच्या पिकांचेही नुकसान करत आहेत.

रस्त्यावरुन वाहतुक करत असताना जनावरांचा कळप वाळपईतील तसेच विविध भागातील रस्त्यावर अचानक समोर येतो. रस्त्यावर ठाण माडून बसलेली गुरु वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे. 

Valpoi News
Bombay High Court At Goa: गोवा खंडपीठाचा निकाल आता कोकणीतून

ही मोकाट गुरे प्लास्टिक व इतर कचरा खातात. त्यातून जनावरे दगावण्याचे प्रकारही वारंवार घडतात. शनिवारी वाळपई नगरपालिका परिसरातील एक भटकी गाय आजारी पडली होती. त्यामुळे गायीला नाणूस येथील गोशाळेत नेण्यात आले. उपचार सुरु असताना ती गाय मरण पावली.

या वेळी गोशाळेचे पशुवैद्यकीय डॉ. रघुनाथ धुरे यांनी तिची शवचिकित्सा केली. त्यावेळी तिच्या पोटात 30 किलो प्लास्टिक आढळून आले. या पूर्वी एका गायीच्या पोटात 70 किलो प्लास्टिक आढळून आले होते. ही मोकाट गुरे मिळेल ते खात असतात. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com