Goa Government | Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant Announcement: राजकीय मतभेद बाजूला ठेवून ; मांद्रेच्या विकासासाठी निधी पुरवणार

Pramod Sawant Announcement: तुये इस्पितळ, केरी-तेरेखोल पुलाला प्राधान्य

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant Announcement: मांद्रे मतदारसंघाच्या विकासाला आवश्‍यक निधी वेळेत उपलब्ध करून देणार असून राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्हाला विकास साधायचा आहे. शिवाय तुये येथील बहुउद्देशीय इस्पितळ इमारत आणि केरी-तेरेखोल येथील रखडलेला पूल या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

श्री भगवती देवीच्या वार्षिक जत्रोत्सवानिमित्त पार्से येथे आले असता पार्सेचे सरपंच अजय कळंगुटकर यांच्या निवासस्थानी चर्चा ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार जीत आरोलकर, माजी आमदार दयानंद सोपटे, आनंद देसाई आदी उपस्थित होते.

तत्कालीन मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पुढाकार घेऊन 52 कोटी रुपये खर्च करून नवीन इस्पितळ इमारत पूर्ण केली होती. परंतु त्यानंतर या इस्पितळाकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले.

2022 च्या निवडणुकीच्या काळात या इस्पितळात केवळ डायलेसिस युनिट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यानंतर काहीच कार्यवाही झाली नाही. शिवाय केरी-तेरेखोल पूलही अर्धवट स्थितीत आहे.

आमदार जीत आरोलकर यांनी जीएसआयडीसी अधिकाऱ्यांसमवेत नुकतीच पाहणी केली होती. शिवाय डिसेंबरमध्ये हे इस्पितळ कार्यान्वित होईल, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली होती.

परंतु काम रखडल्याने तीही आशा मावळली. मात्र, येत्या जुलैमध्ये हे इस्पितळ कार्यान्वित होईल, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी पार्से येथे आमदार जीत आरोलकर यांच्याशी चर्चा करताना दिली. शिवाय केरी-तेरेखोलचा अर्धवट पूलही पूर्ण केला जाईल.

आता राजकारण नको

आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले, की मांद्रे मतदारसंघाच्या विकासात कसलेच राजकारण केले जाणार नाही. राजकारणाची ही वेळ नसून विकासाची आहे. निवडणुका आल्या, की राजकारण करूया, मांद्रेचा सर्वांगीण विकास करायचा आहे.

त्यासाठी सर्वांचे सहकार्य व पाठिंबा आवश्‍यक आहे. लवकरच तुये इस्पितळ आणि रखडलेला केरी-तेरेखोल पूल या दोन्ही प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार असून नव्या वर्षात ते जनतेसाठी खुले होतील, असाही विश्वासही जीत आरोलकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Gochar: 2026 नव्हे 2027 मध्ये होणार शनिदेवाचे राशी परिवर्तन, 'या' 5 राशींना राहावं लागणार सावधान; आरोग्य, धन आणि संबंधांवर थेट परिणाम!

Baba Vanga Predictions: 2026 मध्ये 'या' 5 राशीचे लोक होणार मालामाल, बाबा वेंगांची 'अफाट धनलाभा'ची भविष्यवाणी; शनिदेवाची राहणार कृपा!

IFFIESTA: संगीतप्रेमींनो, IFFI घेऊन आलंय 3 धमाकेदार कॉन्सर्ट्स पूर्णपणे मोफत; कधी आणि कुठे? सविस्तर माहिती येथे!

Royal Enfield Bullet: रॉयल एनफील्डचा नवा धमाका! रेट्रो डिझाईन आणि आधुनिक फीचर्सची कॉम्बो 'बुलेट 650'; गोव्यातील मोटोव्हर्स फेस्टिव्हलमध्ये सादर

St. Xavier Novena: गोंयच्या सायबाचा नोव्हेना होणार सुरु! जुन्या गोव्यात भाविकांची मांदियाळी; वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT