Pramod Sawant Statement: पारदर्शकपणे भरती प्रक्रिया केली जाईल ; परीक्षा देण्याची गरज भासणार नाही

Pramod Sawant Statement: जानेवारीपासून कर्मचारी निवड आयोगाद्वारे नोकरभरती
Goa Government | CM Pramod Sawant
Goa Government | CM Pramod SawantDainik Gomantak

Pramod Sawant Statement: आमचे सरकार राज्यातील प्रत्येक तरुणाला रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्नशील आहे. यापुढे सरकारी नोकरीसाठी वेगवेगळे अर्ज, परीक्षा देण्याची गरज भासणार नाही. कोणाच्याही वशिल्याविना, आमदार-मंत्र्यांकडे न जाता पारदर्शकपणे भरती प्रक्रिया केली जाईल.

जानेवारीपासून कर्मचारी निवड आयोगाद्वारे केवळ वर्षातून एकदा परीक्षा घेऊन नोकर भरती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

राजभवन येथील दरबार हॉलमध्ये आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकर, बाबूश मोन्सेरात, नीलेश काब्राल, नीळकंठ हळर्णकर, सुभाष फळदेसाई, आमदार प्रेमेंद्र शेट, मुख्य सचिव पुनित गोयल उपस्थित होते.

वर्षाला एकदाच परीक्षा

राज्यातील विविध खात्यांच्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज येतात. शिपाई पदासाठी 5 हजार अर्ज, कारकून पदासाठी 10 हजार अर्ज, वेगवेगळ्या परीक्षा, त्यासाठी पुन्हा-पुन्हा अर्ज करावे लागतात.

काहीजण आमदारांकडे जातात. ही वेळ गोव्यातील तरुणांवर येऊ नये, यासाठी शिपायापासून कारकुनापर्यंत सर्व पदांसाठी वर्षातून एकच परीक्षा घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Goa Government | CM Pramod Sawant
Pramod Sawant: राज्यातील सर्व आर्थिक व्यवहार केंद्राच्या तत्त्वानुसार ; राज्यावर 22 हजार कोटींचे कर्ज

नियुक्तीपत्रे दिलेल्यांची खातेवार आकडेवारी

  • पोलिस - 900

  • अग्निशमन - 189

  • कृषी - 59

  • नियोजन आणि सांख्यिकी - 54

  • नदी परिवहन - 11

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com