Goa Dairy Dainik Gomantak
गोवा

Goa Dairy: गोवा डेअरीला 1 कोटीहून जास्त नफा! आर्थिक तूट काढली भरून; 100% अनुदानाची दूध उत्पादकांची मागणी

Goa Dairy Profit: गोवा डेअरी नफ्यात येत असून गेल्या आर्थिक वर्षात १ कोटी २७ लाख रुपये नफा झाल्याची माहिती गोवा डेअरीच्या रविवारी सहकार भवनात झालेल्या आमसभेत देण्यात आली.

Sameer Panditrao

फोंडा: गोवा डेअरी नफ्यात येत असून गेल्या आर्थिक वर्षात १ कोटी २७ लाख रुपये नफा झाल्याची माहिती गोवा डेअरीच्या रविवारी सहकार भवनात झालेल्या आमसभेत देण्यात आली.

गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला रामा परब, व्यंकटेश शेणवी तसेच व्यवस्थापकीय संचालक नवीन कुमार यांच्यासह राज्यातील दूध उत्पादक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मागील काळात गोवा डेअरी आणि पशुखाद्य प्रकल्पातील सुमारे साडेतीन कोटी रुपयांची आर्थिक तूट भरून काढण्यात आली असल्याचीही माहिती दूध उत्पादकांना देण्यात आली.

गोवा डेअरीचे दूध संकलन कमी झाले असून खपही कमी झाल्यासंबंधी सभेत चर्चा करण्यात आली.

आधारभूत किमतीत वाढ करून दिल्यास नवीन दूध उत्पादक या व्यवसायात येऊ शकतात असेही दूध उत्पादकांनी सांगून नवीन दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना राबवण्याची गरज दूध उत्पादकांनी व्यक्त केली.

आधारभूत किमतीवरच दूध उत्पादकांचा खर्च चालत असून सध्या असलेली आधारभूत किंमत वाढीसाठी कार्यवाही झाल्यास दूध उत्पादकांना हायसे वाटेल, असे मत दूध उत्पादकांनी व्यक्त केले. संध्या ४० टक्के अनुदान दिले जाते ते १०० टक्के करण्याची मागणी दूध उत्पादकांनी केली.

दूध उत्पादन वाढीसाठी कामधेनू योजना सुधारित रूपात लागू करण्याची गरजही यावेळी दूध उत्पादकांनी व्यक्त केली. यावेळी दूध उत्पादक संस्थांचे अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर, विकास प्रभू व इतरांनी चर्चेत भाग घेतला.

अपात्र संचालकांवरून सभेत गोंधळ

सहकार खात्याने अपात्र ठरवलेले काही संचालक आमसभेत आल्याने काही प्रतिनिधींनी त्याला आक्षेप घेतला. त्यावर आम्हाला सहकार खात्याने अपात्र केले असले तरी आम्ही दूध संस्थांचे अध्यक्ष असून गोवा राज्य सहकारी बँकेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान करण्यास मुभा दिली होती त्याची आठवण यावेळी करून देण्यात आली. शेवटी त्यांना आमसभेला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली तर काही संचालकांनी सभात्याग केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लिफ्ट देण्याचा बहाणा अन् निर्जन स्थळी लैंगिक अत्याचार; 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार, आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी

Iran Protest: "काहीही झालं तरी झुकणार नाही" अयातुल्ला खामेनेईंचा ट्रम्प यांच्यावर जोरदार प्रहार; जागतिक राजकारणात खळबळ

ED Raid Kolkata: कोळसा घोटाळ्याचं 'गोवा कनेक्शन'! I-PAC वरील धाडीनं ममता बॅनर्जींचा हाय-व्होल्टेज ड्रामा; कोलकात्यात तणावाचं वातावरण

Nagnath Mahadev Temple Theft: पर्रा येथील नागनाथ महादेव मंदिरात तिसऱ्यांदा चोरी; 30 हजारांची रोकड लंपास, मूर्तीचीही विटंबना

Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

SCROLL FOR NEXT