Goa Dairy: गोवा डेअरीतील दूध आधारभूत रक्कम 30 जुलैपर्यंत; शिरोडकरांचे आश्वासन

Subhash Shirodkar: डेअरीच्या दूध उत्पादकांची थकीत रक्कम ३० जुलैपर्यंत देण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले. त्यासाठी सरकारने बारा कोटीची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.

फोंडा: राज्यात सहकार क्षेत्रात वाढ करताना रोजगाराला प्राधान्य देण्यात येत असून गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांची थकीत आधारभूत रक्कम येत्या ३० जुलैपर्यंत देण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिले. त्यासाठी सरकारने बारा कोटी सत्तर लाख रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या सहकार खात्याच्या स्थापनादिनानिमित्त फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात रविवारी आयोजित कार्यक्रमात शिरोडकर बोलत होते. यावेळी आरबीआय संचालक मंडळाचे सदस्य सतीश मराठे, अनिवासी भारतीय आयुक्त तथा गोवा बागायतदारचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, माजी मंत्री तथा आदर्श सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश वेळीप तसेच सचिव यतिंद्र मराळकर, विजयकांत गावकर व सहकार निबंधक आशुतोष आपटे आदी उपस्थित होते.

शिरोडकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकारमंत्री अमित शहा यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे, ते पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्रात हरितक्रांतीप्रमाणे दुग्ध क्षेत्रातही श्वेत क्रांतीची आवश्यकता असून नवीन डेअऱ्या सुरू करण्यासाठी दूग्ध उत्पादकांनी प्रयत्न केले पाहिजे. आज सहकार ग्रामाची खरी गरज असून ग्रामीण भागातील गरजेनुसार वस्तूंची निर्मिती करण्याबरोबरच वितरणाचीही प्रभावी शैली विकसित व्हायला हवी. त्यासाठी युवा पिढीने सहकार क्षेत्रात मोठ्या संख्येने यायला हवे, असे ते म्हणाले.

सतीश मराठे यांनी सहकार क्षेत्राची उपलब्धी आणि वास्तविकता यावर बोट ठेवताना युवा पिढीचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. सहकार कायद्याचा सर्वसमावेशक वापर व्हायला हवा. तसेच सहकार प्रतिनिधींना वेळोवेळी प्रशिक्षण द्यायला हवे, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com