Goa Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime रोखण्यासाठी पोलीस करतायत शर्थ; पर्वरीत जेष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन

Goa Cyber Crime: पर्वरीत वृद्ध लोकांसाठी सायबर गुन्हे आणि फसवणूक यावर मार्गदर्शनपर कार्यक्रम, कार्यक्रमाला जवळपास १०० जेष्ठ नागरिकांची हजेरी

गोमन्तक डिजिटल टीम

Cyber Crime Goa

पर्वरी: गोवा पोलीस आणि गोवा पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाने एकत्र येऊन पर्वरीत वृद्ध लोकांसाठी सायबर गुन्हे आणि फसवणूक यावर एक मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता. पर्वरीतील जिमखाना सभागृह, डिफेन्स कॉलनी येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला जवळपास १०० जेष्ठ नागरिकांनी हजेरी लावली.

पोलिसांकडून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जेष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षा काय असते किंवा सायबर फ्रॉडपासून बचाव कसा करावा याविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात प्रश्न-उत्तरांचा समावेश असल्याने उपस्थितांनी मनातील सर्व शंकांची उत्तरं मिळवली.

सायबर सुरक्षा मार्गदर्शनपर कार्यक्रमासाठी डीवायएसपी सायबर क्राईम आशिष शिरोडकर, पीआय सायबर क्राईम दीपक पेडणेकर, पीआय विद्यानंद पवार आणि पर्वरीचे पीआय राहुल परब उपस्थित होते.

सध्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे विश्व विस्तारले आहे. हे गुन्हेगार विविध प्रकारे फसवणूक करुन पैसे उकळण्याचे काम करत असतात आणि धक्कादायक बाब म्हणजे अनेकजण अशा प्रलोभनांना बळी देखील पडतायेत.

मात्र गोवा पोलीस आणि सायबर क्राईम विभाग हे गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील असून काल (दि. २२ ऑक्टोबर) रोजी समोर आलेल्या बातमीनुसार गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (14C) केलेल्या सर्वेनुसार गोवा तपासकामात ५ व्या क्रमांकावर आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात राज्याने केलेल्या ३०.४६ टक्क्यांच्या रिकव्हरी रेटमुळे ही बाब आणखीन उल्लेखनीय ठरली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

Goa Today's News Live: गिरीमध्ये पाण्याची पाईपलाईन फुटली

Goa Politics: खरी कुजबुज; युतीचा आवेश संपला का?

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT