Cyber Crime रोखण्यात गोवा अग्रेसर; इतर राज्यांच्या तुलनेत मिळवला पाचवा क्रमांक

Cyber Crime Goa: देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करणारं गोवा हे पाचवं राज्य
Goa Cyber Goa: देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करणारं गोवा हे पाचवं राज्य
Cyber Crime GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Cyber Crime Goa

पणजी: गोव्याने सायबर गुन्हे रोखण्यासाठी काही महत्वपूर्ण पावले उचलली आहेत आणि यांमुळेच गृह मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने (14C) केलेल्या सर्वेनुसार गोवा तपासकामात ५ व्या क्रमांकावर आहे.

सप्टेंबर महिन्यात राज्याने केलेल्या ३०.४६ टक्क्यांच्या रिकव्हरी रेटमुळे ही बाब आणखीन उल्लेखनीय ठरली आहे.

सायबर गुन्हे आटोक्यात कसे?

गोवा पोलिस सध्या राज्यात घडणारे सायबर गुन्हे आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. राज्यातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर सेलच्या कर्मचाऱ्यांचा विस्तार करण्यात आलाय तसंच I4C द्वारे ८०० गोवा पोलिस अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येतंय.

पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांचा सामाना करण्यासाठी वाढवण्यात आलेली तपासकामाची क्षमता, प्रादेशिक बँक अधिकाऱ्यांसोबतच्या बैठका तसेच तपासकाम करण्यासाठी दिल्ली येथे नियुक्ती करण्यात आलेले पोलिस कर्मचारी, पोलिस निरीक्षकांसाठी मार्गदर्शक कार्यक्रम व प्रत्येक पोलिस स्थानकामध्ये सायबर गुन्हे अन्वेषणकर्त्यांच्या नियुक्तीमुळे मिळालेली बळकटी ही यामागील यशाची कारणे आहेत अशी माहिती सायबर गुन्हे विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

Goa Cyber Goa: देशभरातील इतर राज्यांच्या तुलनेत सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करणारं गोवा हे पाचवं राज्य
Ration Shops Color Code: स्वस्त धान्य दुकानांना आता ‘कलर कोड’! वाहतूकखर्च दिला जाणार किलोमीटरनुसार

या घडीला गोवा सायबर गुन्ह्यांचा मुकाबला करण्याच्या बाबतीत फक्त लक्षद्वीप, सिक्कीम, झारखंड, केंद्रशासित प्रदेश दमण-दीव आणि दादरा-नगर हवेली यांच्या मागे आहे. गोवा सायबर गुन्हे विभागामार्फत शालेय संगणक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षण खात्यामार्फत मदत घेण्यात येत आहे. हे प्रशिक्षित शिक्षक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेबद्दल शिक्षित करतील.

बँकांमध्ये काही खात्यांचा वापर मनी लाँड्रिंग आणि फसव्या व्यवहारांसारख्या बेकायदेशीर क्रियाकलापांसाठी केला जातो, गोवा पोलिसांनी अशी बँक खाती कायमची बंद करण्याचे आदेश जारी केलेत तसेच फसवेगिरीमध्ये आढळलेल्या पाच बँक मॅनेजरना चौकशीसाठी सायबर क्राईम पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलंय.

गोव्यात बेनामी बँक खाते उघडू नये यासाठी बँकासोबत जनजागृती कार्यक्रम कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायबर गुन्ह्यांची जागरूकता आणि तपास बळकट करण्यासाठी हे प्रयत्न केले जात असल्याचे गुप्ता म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com