Cyber Scam: लग्ना खातीर डेटींग फटींगपणां! गोवा पोलिसांकडून सायबर स्कॅम अलर्ट, केले महत्वाचे आवाहन

Goa Cyber Crime: एकदा विश्वास संपादन केल्यानंतर सायबर गुन्हेगार समोरच्या व्यक्तीकडे पैशाची मागणी करतात.
Cyber Scam: लग्ना खातीर डेटींग फटींगपणां! गोवा पोलिसांकडून सायबर स्कॅम अलर्ट, केले महत्वाचे आवाहन
Goa Cyber CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: डिजिटल क्रांतीत सायबर गुन्हेगारांचे विश्व विस्तारले आहे. नानाविध पद्धतीने सायबर गुन्हेगार फसवणूक करुन पैसे उकळण्याचे काम करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अनेकजण प्रलोभनांना बळी पडतायेत.

लग्नाला स्थळ शोधण्यासाठी अनेकजण मेट्रोमोनियल साईट किंवा App चा वापर करतात. पण, यात देखील आर्थिक फसवणूक होत असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

कशा प्रकारे होते फसवणूक

१) सायबर गुन्हेगार सर्वप्रथम फेक प्रोफाईल तयार करतात. यात समोरच्या व्यक्तीला भूरळ पाडतील असे फोटो आणि माहिती त्यात दिली जाते.

२) लग्नासाठी भावनिक आवाहन आणि मेसेज करुन ते समोरच्याचा विश्वास संपादन करतात.

३) एकदा विश्वास संपादन केल्यानंतर समोरच्या व्यक्तीकडे पैशाची मागणी करतात. पैशाची मागणी करताना काहीतरी महत्वाची गरज असल्याचे दर्शवतात.

४) सायबर गुन्हेगार तुमच्याकडून वैयक्तिक माहिती देखील घेऊ शकतात आणि त्याचा गैरवापर करण्याचा धोका असतो.

Cyber Scam: लग्ना खातीर डेटींग फटींगपणां! गोवा पोलिसांकडून सायबर स्कॅम अलर्ट, केले महत्वाचे आवाहन
Goa Investment: गोव्यात गुंतवणूकीसाठी मुख्यमंत्र्यांची 'अमेझिंग' चर्चा! 'दुबई आयकॉन्स'ला खास निमंत्रण

लग्नासाठी इच्छुक असणारे मुले - मुली आजकाल सह उपलब्ध असणाऱ्या मेट्रोमोनियल साईट किंवा App च्या माध्यमातून प्रोफाईल तयार करतात.

अशा विविध मेट्रोमोनियल साईट किंवा App वर आता सायबर गुन्हेगार देखील सक्रिय झाले आहेत. सायबर गुन्हेगार खोट्या माहितीच्या आधारे आर्थिक फसवणूक करतात. अशा सायबर गुन्हेगारांपासून संभाळून राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com