Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Digital Arrest: TRAI, CBI अधिकारी असल्याचे भासवून गोमंतकीयांना धमकावले; उकळले 1.22 कोटी; कर्नाटक, गुजरातमधून संशयितांना अटक

Goa cyber crime: गोवा सायबर गुन्हे पोलिस स्थानकाने ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अटक करून एकूण १ कोटींची सायबर फसवणूक उघडकीस आणली आहे.

Sameer Panditrao

पणजी: गोवा सायबर गुन्हे पोलिस स्थानकाने ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून अटक करून एकूण १ कोटी २२ लाख ५० हजार रुपयांची सायबर फसवणूक उघडकीस आणली आहे.

२५.५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कर्नाटक, दक्षिण बंगळुरू येथून संशयित आरोपी एस. राकेश आणि ९७ लाखांच्या फसवणूक प्रकरणात संशयित आरोपी म्हणून सूरत (गुजरात) येथून अर्साद शेख याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी स्वतःला ट्राय आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून दोन गोमंतकीयांना धमकावले आणि आधार व सीमकार्डचा गैरवापर केल्याचे सांगत पैसे उकळले.

दोन्ही संशयितांच्या बँकेतील खात्यांमधून देशभरातील विविध राज्यांतील फसवणूक प्रकरणांमधील तब्बल १२ कोटी रुपयांची रक्कम वळती करण्यात आली असल्याचे उघड झाले आहे. वास्को येथील एका रहिवाशाकडून संशयितांनी आधार कार्ड मनी लॉन्डरिंगसाठी वापरले जात असल्याचा बनाव करून २५.५० लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे उकळले.

तर तिसवाडी येथे राहणाऱ्या महिलेला, तिच्या सीमकार्डचा वापर मानवी तस्करीसाठी होत असल्याचा बनाव करून सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अटक’मध्ये अडकल्याचे सांगत ९७ लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे उकळले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३१८(४), ३१९(२) सह कलम ३(५) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६-डी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अर्साद शेख याने महिलेकडून पैसे घेऊन ती रक्कम दोन खात्यांमध्ये वळविली. एका खात्यात ५१ लाख आणि दुसऱ्या खात्यात ४६ लाख रुपये टाकण्यास महिलेला भाग पाडले. याप्रकरणी पोलिसांनी अर्सादला सूरतमध्ये अटक केली. त्याने फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले असून, त्याच्या खात्यातून गोवा, महाराष्ट्र, तेलंगणा, केरळ व कर्नाटकमध्ये मिळून एकूण १.२० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंदार गावकर, नवीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथकांनी हेड कॉन्स्टेबल विराज नार्वेकर, कॉन्स्टेबल शशांक गवडे, सुनील रेणती, यश कोळे यांच्या सहकार्याने ही कारवाई केली. साहाय्यक अधीक्षक अक्षत आयुष आणि अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या देखरेखीखाली दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.

११ राज्यांमध्ये कारनामे

सायबर गुन्हे पोलिसांनी आर्थिक व्यवहार तपासून एस. राकेश (विनायकनगर, बंगळुरू) याला फ्लिपकार्ट वेअरहाऊसमधून अटक केली. त्याच्या बँक खात्यातून फसवणुकीची रक्कम मिळाली असून, त्याचे खाते ११ राज्यांतील फसवणूक प्रकरणांमध्ये वापरले आहे. महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, गुजरात, हरियाणा, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांमधून २२ प्रकरणांमध्ये एस. राकेश याच्या खात्यावर एकूण ११ कोटी ३३ लाख ५६ हजार ४३८ रुपये असल्याचे आढळले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

juva: सफर गोव्याची! चारही बाजूने नदी आणि मध्ये वसलेले 'जुवे'

Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

SCROLL FOR NEXT