
पणजी: बलात्कार, खूनाचा प्रयत्न आणि धमकी देणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये दोष सिद्ध झाल्याने मेरशी येथील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाने (पॉक्सो) आरोपी लालरिनुंगा लालफाकझुआला याला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
न्यायमूर्ती दुर्गा व्ही. मडकईकर यांच्या न्यायालयाने २२ जुलै रोजी आरोपीला दोषी ठरवले, तर २९ जुलै २०२५ रोजी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी १८ डिसेंबर २०१९ पासून म्हणजेच ५ वर्षे ७ महिने आणि ११ दिवसांच्या कालावधीसाठी कोठडीत आहे. आरोपी कोठडीत असल्याने उपरोक्त कालावधी सीआरपीसीच्या कलम ४२८ अंतर्गत रद्द करण्यात आला आहे.
न्यायालयाने कलम ३४२ आयपीसीनुसार आरोपीला १ वर्ष साधी कैद व १,००० रुपये दंड ठोठवण्यात आला आहे. दंड न भरल्यास २ दिवसांची अतिरिक्त साधी कैद होणार आल्याचे देखील नमूद करण्यात आले.
तसेच धमकी दिल्याने आयपीसी कलम ५०६(ii) अंतर्गत ७ वर्ष साधी कैद व २५,००० रुपये दंड; दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद, बलात्कार प्रकरणी आयपीसी कलम ३७६ अंतर्गत१० वर्ष सक्तमजुरी व ५०,००० रुपये दंड; दंड न भरल्यास १ महिन्याची सक्तमजुरी आणि खूनाचा प्रयत्न केल्याच्या आयपीसी कलम ३०७ अंतर्गत १० वर्ष सक्तमजुरी व ५०,००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास १ महिन्याची सक्तमजुरी देखील आदेशात नमूद करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.