Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

Russian woman ganja case: विशेष अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील गुन्ह्यात आरोपी असलेल्या रशियन महिला विक्टोरिया फोमेनको हिला रशियात परतण्याची परवानगी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिली आहे.
Court Order
CourtCanva
Published on
Updated on

म्हापसा: विशेष अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील (एनडीपीएस) गुन्ह्यात आरोपी असलेल्या रशियन महिला विक्टोरिया फोमेनको हिला रशियात परतण्याची परवानगी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिली आहे. फोमेनको व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्याच्या सर्व सुनावणीत सहभागी होणार असून, न्यायालयाने तिला सशर्त मंजुरी दिली आहे.

फोमेनको हिला ११ एप्रिल २०१९ रोजी अंमलीपदार्थ विरोधी पथक, पणजी यांनी ११८ ग्रॅम गांजा बाळगल्याप्रकरणी आणि गांजाची शेती केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. तिला २९ एप्रिल २०१९ रोजी जामिनावर मुक्त करण्यात आले असून, तिने जामिनासाठी आवश्यक हमीपत्र देखील सादर केले आहे. तिच्याकडे वैध रशियन पासपोर्ट व टुरिस्ट व्हीसा देखील आहे.

Court Order
Goa Police Crime: खाकी वर्दीला काळिमा! पबबाहेर महिलेशी अश्‍‍लील वर्तन; दोघा पोलिसांचे निलंबन, Video

फोमेनकोने १० जून २०२५ रोजी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात आपले पतीशी कोणतेही संबंध नाहीत, असे नमूद केले आहे. सध्या ती तिच्या चार वर्षांच्या मुलीसह (फोमेनको मिरास्लावा ग्रिगोरीएवना, जन्म – ४ सप्टेंबर २०२०) भारतात राहते.

Court Order
Goa Crime: 'तुमच्यासाठी पार्सल आहे' म्हणून बाहेर बोलावले, साखळी हिसकावून पळाला; गुजरातच्या कुख्यात चोरट्याला अटक

आर्थिक आधार, रोजगार, किंवा कोणतीही सामाजिक सुरक्षा नसल्याने आपल्यावर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रशियात माझे कुटुंब स्थिर असून, तिथे निवारा, रोजगार आणि सामाजिक आधार मिळू शकतो असे त्यांनी अर्जात स्पष्ट केले. मुलीच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी ती रशियात परतण्यास इच्छुक असल्याचे देखील तिने अर्जात स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Goa Drug Case
Russian Woman Marriage Registration
Ishan Badgujar Culpable Homicide Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com