Goa Curfew Dainik Gomantak
गोवा

Goa Curfew: राज्यातील संचारबंदी मध्ये शिथिलता?

गणेश चतुर्थीच्या काळात कोविड नियमावलीत सूट देण्यावरून सरकारने सावध भूमिका घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात (Goa) कोरोनाचा (Covid-19) धोका कायम असला तरी बाधित रुग्णांची संख्या प्रतिदिन शंभरापेक्षा कमी येत आहे. गेल्या चोवीस तासात गोमेकॉ व दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा इस्पितळात प्रत्येकी एक मिळून दोघांचा मृत्यू झाला आहे. (Goa curfew likely to be lifted)

5688 जणांची कोरोना चाचणी करण्यात येऊन त्यात 67 जण बाधित सापडले. राज्यात संचारबंदीची मुदत येत्या 16 ऑगस्टला सकाळी 7 वा. संपत असून ती पूर्ण उठविण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यभरात सध्या 957 कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. नव्या 67 रुग्णांपैकी 13 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले.

लसीकरण वाढले

शुक्रवारी विविध केंद्रांवर 2695 जणांना पहिला तर 4625 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 12 रोजी नोंद न झालेले पहिला डोस असलेले 807 तर दुसरा डोस असलेले 952 मिळून एकूण 9079 जणांना डोस देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 7 लाख 66 हजार 702 तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 6 लाख 37 हजार 896 वर गेली आहे.

कोविड नियमावलीबाबत सरकारची सावध भूमिका

गणेश चतुर्थीच्या काळात कोविड नियमावलीत सूट देण्यावरून सरकारने सावध भूमिका घेतली आहे. सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच याविषयीचा निर्णय घेऊ, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजीत एका कार्यक्रमानंतर त्यांना चतुर्थीच्या काळात कोविड नियमावलीत सूट देण्याचा विचार आहे का, असे विचारल्यावर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, उपजिल्हाधिकाऱ्यांना संबंधित गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करण्यास सांगितले आहे. त्यांचे म्हणणे, आरोग्य यंत्रणेचे म्हणणे, प्रशासनाचे निरीक्षण याआधारे निर्णय घेतला जाईल. ते म्हणाले, जनतेने कोविड अद्याप नष्ट झालेला नाही हे लक्षात घेऊन वागले पाहिजे. गर्दी टाळावी, अकाकरण सार्वजनिक ठिकाणी जावू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cipla Share Price: सिप्लाच्या गोव्यातील प्लांटला Good Tag; कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ

Diwali 2024: उधळण आनंदाची! तेजोमय दिव्यांना बहरलेला 'दिपोत्सव'

Goa Monsoon 2024: पेडणे, सत्तरी, डिचोलीत ढगाळ वातावरण; तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

VIDEO: धक्कादायक! मोकाट कुत्र्याच्या शेपटीला बांधून तरुणाने फोडले फटाके; व्हिडिओ व्हायरल

Suyash Prabhudesai: पायाच्या दुखापतीनं केला घात! मिझोरामविरुद्धच्या सामन्याला गोव्याचा स्टार मुकणार

SCROLL FOR NEXT