sword attack Mungul Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: तलवार-लाठ्यांनी हल्ला, नंतर गाडीवर गोळीबार; गोव्यात भल्या पहाटे तरुणांवर प्राणघातक हल्ला

Fatorda Attack News: हल्लेखोरांनी तलवारी आणि लाठ्यांचा वापर करून तरुणांना गंभीर जखमी केले. तसेच, त्यांच्या गाडीवर गोळीबारही केला.

Akshata Chhatre

मडगाव: गोव्यातील फातोर्डा आणि कोलवा येथील सीमेवर असलेल्या मुंगूल भागामध्ये पहाटेच्या वेळी दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी तलवारी आणि लाठ्यांचा वापर करून तरुणांना गंभीर जखमी केले. तसेच, त्यांच्या गाडीवर गोळीबारही केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हल्ल्यातील तरुणांवर रुग्णालयात उपचार सुरु

या हल्ल्यात रफीक ताशन (२४) आणि युवकेश ताशन (२०) हे दोन तरुण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने गोव्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या हल्ल्यात त्यांचे प्राण वाचले असले तरी त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

घटनास्थळी पोलिसांना मिळाला मोठा सुगावा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तपासणीदरम्यान, पोलिसांना गाडीजवळ एक रिकामी बुलेट शेल आणि एक जिवंत काडतूस सापडले. शगुन हॉटेलजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. या हल्ल्यामागे नेमके काय कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT