Goa bar dispute arrest
Drunk Youths Misbehave with Police in Bicholim GoaDainik Gomantak

Goa Crime: बारमध्ये वाद, पोलिसांशी अरेरावी,डिचोलीत मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा; तिघांना अटक

Goa Bar Dispute News: दारूच्या नशेत गोंधळ घालून पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या तीन स्थानिक तरुणांना डिचोली पोलिसांनी ताब्यात घेतले
Published on

डिचोली: दारूच्या नशेत गोंधळ घालून पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या तीन स्थानिक तरुणांना डिचोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हाळशी-डिचोली येथील एका बारमध्ये झालेल्या वादामुळे ही घटना घडली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत शांतता भंग करणाऱ्या या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

व्हाळशी येथील बारमधील वादातून गोंधळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हाळशी येथील एका बारमध्ये तिघांचा वाद झाला होता. त्यानंतर हे तिघेही दारूच्या नशेत आणि संतप्त अवस्थेत थेट डिचोली पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे त्यांनी पोलिसांसमोरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि आक्रमक वर्तन केले.

शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिसांनी पुढील कोणताही गंभीर गुन्हा घडू नये यासाठी त्यांना ताब्यात घेतले. डिचोली पोलिसांनी या तिघांनाही शांतता भंग केल्याबद्दल आणि सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Goa bar dispute arrest
Goa Crime: मोटरसायकलवरून आले, मंगळसूत्र खेचून पळाले; दागिने पुण्यात जप्त, 8 महिन्यांनंतर दोघा चोरट्यांना अटक

पोलिसांकडून ३१ ठिकाणी तपासणी

उत्तर गोवा पोलिसांनी सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि गुन्हे रोखण्यासाठी या सप्ताहात मोठ्या प्रमाणावर नाका तपासणी मोहीम राबवली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई उत्तर गोव्यात एकूण ३१ ठिकाणी करण्यात आली.

प्रत्येक ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक पातळीवरील अधिकारी तैनात केले होते. नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षिततेची हमी देण्यासाठी तसेच कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या सततच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याची माहिती उत्तर गोवा पोलिसांनी दिली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांनी माध्यमांना वरील माहिती दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com