gold theft news Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 12 लाखांच्या दागिन्यांसह बायको प्रियकरासोबत फरार, नवऱ्याने केली तक्रार; केरळमधील प्रेमी गोव्यात जेरबंद

Kerala couple arrested: प्रियकरासोबत पळून आलेली ही युवाती १२ लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाली होती. सध्या या दोघांना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.

Akshata Chhatre

बागा: केरळमधील एका प्रियकरासोबत पळून आलेल्या २४ वर्षीय युवतीला आणि तिच्या प्रियकराला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. प्रियकरासोबत पळून आलेली ही युवाती १२ लाख रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाली होती. सध्या या दोघांना केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.

विवाहित युवती प्रियकरासोबत पळाली

२४ वर्षीय युवतीच्या पतीने नोंदवलेल्या तक्रारीनुसार १९ एप्रिल रोजी ती तिच्या प्रियकरासोबत गोव्यात पळून आली होती, तिने सोबत १२ लाख रुपयांचे दागिने आणले होते आणि हे दोघे बागामधील एका गेस्ट हाऊसमध्ये राहात होते.

हे दोघे संशयित गोव्यात असल्याची माहिती मिळताच केरळ पोलिसांनी ताबडतोब गोवा पोलिसांना याबद्दल सूचना दिली आणि यानंतर गोवा पोलिसांनी दोघांना हुडकून काढण्याची मोहीम सुरु केली. पर्यटक पोलीस युनिटचे पोलीस निरीक्षक जतिन पोतदार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली.

हा रिक्षाचालक एक सराईत गुन्हेगार

बागा येथील एका गेस्ट हाऊसमध हे दोघे पोलिसांच्या हाती सापडले. सर्व आवश्यक चौकशी कल्यानंतर दोघांनाही केरळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

संशयित आरोपी विष्णू ए. हा एक रिक्षाचालक असून तो २४ वर्षीय महिला तिच्या मुलीला त्याच्या रिक्षामधून शाळेत सोडायची.

याचवेळी दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि या दोघांनी दागिन्यांसह पळून जाण्याचा बेत आखला. मिळालेल्या माहितीनुसार हा रिक्षाचालक एक सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT