Goa Crime: 'त्याने अल्पवयीन मुलीच्या रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला', अस्नोडा येथील हॉटेलमध्ये असभ्य वर्तन करणाऱ्या ओडिशाच्या तरुणाला अटक

Goa Police Action: संशयित व्यक्ती या अल्पवयीन मुलीकडे सातत्याने पाहत होता. एवढेच नव्हे तर या संशयिताने अल्पवयीन मुलीच्या रुममध्ये देखील घुसण्याचा प्रयत्न केला.
Goa Crime News
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

कोलवाळ: अस्नोडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तारांकीत हॉटेलमध्ये ओडिशाच्या तरुणाने असभ्य वर्तन करत अल्पवयीन मुलीकडे एकसारखे पाहत तिच्या रुममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) रात्री हा प्रकार उघडकीस आला.

अस्नोडा येथे हॉटेलमध्ये काही लोक आले होते. याच हॉटेलमध्ये एक अल्पवयीन मुलगी देखील आपल्या वडिलांसोबत आली होती. दरम्यान, संशयित व्यक्ती या अल्पवयीन मुलीकडे सातत्याने पाहत होता. एवढेच नव्हे तर या संशयिताने अल्पवयीन मुलीच्या रुममध्ये देखील घुसण्याचा प्रयत्न केला.

Goa Crime News
Pahalgam Terrorist Attack: हेच ते ज्यांनी निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला; पहलगाम हल्ल्यातील दहतवाद्यांचे चेहरे आले समोर

हा प्रकार मुलीच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोलवाळ पोलिसांत धाव घेत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. कोलवाळ पोलिसांनी या घटनेची दखल घेत ओडिशा येथील ३० वर्षीय पर्यटकाला अटक केली आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com