
मडगाव: गोव्यात गुरुवारी (23 एप्रिल) दोन धक्कादायक घटना समोर आल्या. पहिली घटना मडगाव येथून तर दुसरी सोर्ला-माकाझन येथून समोर आली. मडगाव येथील अग्निशामक दलाच्या कार्यालयाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला तर सोर्ला-माकाझन येथेही तलावात अज्ञाताचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. सध्या या दोन्ही घटनांसंबंधी अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान, मडगावात (Margao) गुरुवारी (23 एप्रिल) अग्निशामक दलाच्या कार्यालयाजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने एकच हल्लकल्लोळ उडाला. या घटनेविषयी तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मयत व्यक्तीचा पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीचे वय 30-35 वर्षे असू शकते. हा नैसर्गिक मृत्यूची असल्याची पोलिसांनी नोंद केली. पुढे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरिक्षक अनुष्का परब यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे.
दुसरीकडे, सोर्ला-माकाझन येथून अशीच थरकाप उडवणारी घटना समोर आली. येथे एका तलावात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. मृताची अद्याप ओळख पटलेली नसून साधारण त्याचे वय 45 वर्ष असल्याचे सांगितले जाते. मायणा-कुडतरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. येथेही पोलिसांनी हा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे सांगितले. या व्यक्तीचाही मृतदेह पोलिसांनी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात (Hospital) पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला. पोलिस आता कोणी समोर येऊन बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवतील का? या प्रतिक्षेत आहेत. या प्रकरणाचा तपास वेरोनिक कुन्तिन्हो करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.