Goa Crime: खोर्ली येथे केरळमधील युवकाने संपवले जीवन, कारण अद्याप अस्पष्ट

Suicide case in Bardez: बार्देश तालुक्यातील खोर्ली गावात एका ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: बार्देश तालुक्यातील खोर्ली गावात एका ३२ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एम. अखिल असे या युवकाचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी होता. तो काही काळापासून खोर्ली येथील भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता.

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. म्हापसा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक अजय धुरी, महिला पोलिस उपनिरीक्षक रविना सावटोडकर आणि इतर पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

Goa Crime
Bhandari Samaj Goa: ...तसे न केल्यास देवानंद नाईकांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार, गावकर यांचा इशारा

बुधवारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्राथमिक तपासात युवकाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मृताच्या खोलीत कोणतीही चिठ्ठी किंवा अन्य माहिती मिळून आलेली नाही.

Goa Crime
Goa Fishermen: गोमंतकीय मच्छीमारांना दिलासा, शुल्कात सवलत देण्यास CM सावंतांची सहमती

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय धुरी व महिला उपनिरीक्षक रविना सावटोडकर करत आहेत. आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलिस विविध अंगाने तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com