Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात सात दिवसांत चार अल्‍पवयीनांची अपहरणे, एका प्रकरणाचा छडा; तीन तपासाविना प्रलंबित

Goa Crime News: दक्षिण गोव्‍यात अल्‍पवयीन मुलांचे अपहरण होण्‍याची प्रकरणे वाढली असून मागच्‍या सात दिवसांत कोलवा, कुंकळ्‍ळी, केपे व मडगाव अशा चार ठिकाणी अल्‍पवयीनांच्‍या अपहरणांची प्रकरणे नोंद झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: दक्षिण गोव्‍यात अल्‍पवयीन मुलांचे अपहरण होण्‍याची प्रकरणे वाढली असून मागच्‍या सात दिवसांत कोलवा, कुंकळ्‍ळी, केपे व मडगाव अशा चार ठिकाणी अल्‍पवयीनांच्‍या अपहरणांची प्रकरणे नोंद झाली आहेत. त्‍यापैकी एकाच प्रकरणाचा छडा पोलिस लावू शकले तर तीन प्रकरणांचा तपास अजूनही प्रलंबित आहे.

११ नोव्‍हेंबर राेजी कुंकळ्‍ळी पोेलिसांतही अशीच तक्रार नोंद करण्‍यात आली होती. ओडिसा येथील एका व्यक्तीने आपल्‍या अल्‍पवयीन मुलाचे तलवाडा-कुंकळ्‍ळी येथून अपहरण केल्‍याची तक्रार नोंद केली होती. याही प्रकरणात गुन्‍हा नोंद केला असून कुंकळ्‍ळीचे उपनिरीक्षक साहिल पागी हे तपास करीत आहेत.

केपे पोलिस स्‍थानकातही १५ नोव्‍हेंबर रोजी अशी अपहरणाची केस नोंद झाली हाेती. एका अल्‍पवयीन मुलीच्‍या आईने रात्री ८.३० वा.च्‍या दरम्‍यान कुणीतरी आपल्‍या मुलीचे अपहरण केल्‍याची तक्रार दिली होती. या प्रकरणात सध्‍या उपनिरीक्षक याेगेश गावकर हे तपास करीत आहेत.

१६ नोव्‍हेंबर राेजी अशाचप्रकारचे एक प्रकरण मडगाव पोलिसांत नोंद झाले असून खारेबांद येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्‍या अल्‍पवयीन मुलीचे कुणीतरी अपहरण केल्‍याची तक्रार दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्‍हा नोंद केला असून तपास सुरू आहे.

अल्‍पवयीन मुलांचे अपहरण होण्याच्या वाढत्या प्रकरणांमुळे पालक चिंतेत आहेत. या प्रकरणांचा वेळीच तपास लावणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असले तरी पोलिस यंत्रणा याबाबत गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोलव्यातही तक्रार

अशाच प्रकारची एक तक्रार कोलवा पोलिस स्‍थानकात नाेंद झाली होती. माजोर्डा परिसरातून तीन अल्‍पवयीन मुलगे नाहीसे झाले होते. या प्रकरणात अपहरणाची केस नोंद झाली होती. मात्र, नंतर हे तिघेहीजण केरळमध्‍ये सापडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: 'घर घर मे दिवाली है, मेरे घर मे अंधेरा' गोमंतकीय सिनेकर्मींची अवस्था

Goa Beach Wedding: परवानगी नसताना घातला मांडव, बीच वेडिंगच्या नादात 1 लाखांचा दंड, गोव्यात घडला अजब प्रकार; वाचा

'अवामी लीग'ला नेस्तनाबूत करण्याचे षडयंत्र! हसीनांच्या मृत्युदंडामागे राजकीय सूड? - संपादकीय

क्रिकेट जगतात खळबळ! रोहित-विराटच्या निवृत्तीचा 'डाव' गंभीरने रचला? पुजारानंतर आणखी एका खेळाडूचा 'हल्लाबोल'

Goa Politics: खरी कुजबुज; 'त्या' भावी नगरसेवकांना हवाय युरीचा आशीर्वाद!

SCROLL FOR NEXT