Goa Taxi: यापुढे 'लिव्‍ह अँड लायसन्‍स'वर नोंदणी नाही! व्यावसायिक वाहनांवर CM प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण; लवकरच परिपत्रक जारी होणार

CM Pramod Sawant On Taxi: ट्रक, टॅक्‍सी अशा व्‍यावसायिक वाहनांची यापुढे ‘लिव्‍ह अँड लायसन्‍स’वर नोंदणी न करण्‍याचे राज्‍य सरकारने निश्‍चित केले आहे.
CM Pramod Sawant On Taxi
CM Pramod Sawant On TaxiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ट्रक, टॅक्‍सी अशा व्‍यावसायिक वाहनांची यापुढे ‘लिव्‍ह अँड लायसन्‍स’वर नोंदणी न करण्‍याचे राज्‍य सरकारने निश्‍चित केले आहे. स्‍थानिक व्‍यावसायिकांच्‍या हितासाठीच सरकारने हा निर्णय घेतला असून, त्‍यासंदर्भातील परिपत्रक लवकरच जारी करण्‍यात येईल, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

राज्‍यातील ट्रक मालक संघटनांनी मंगळवारी रात्री आमदार जीत आरोलकरांसोबत मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांची त्‍यांच्‍या आल्‍तिनोतील सरकारी बंगल्‍यावर भेट घेत, व्‍यावसायिक वाहनांची ‘लिव्‍ह अँड लायसन्‍स’ वर नोंदणी करण्‍याचे परिपत्रक मागे घेण्‍याची मागणी केली होती.

CM Pramod Sawant On Taxi
IFFI Goa 2025: पणजीत आजपासून 'इफ्‍फी'तरंग, उद्‌घाटन सोहळ्याला 'पास'ची गरज नाही

काही वर्षांपूर्वी वाहतूक संचालकांनी ‘लिव्‍ह अँड लायसन्‍स’ वर व्‍यावसायिक वाहनांची नोंदणी करण्‍याचे परिपत्रक वाहतूक संचालकांनी जारी केले होते. त्‍याचा लाभ घेऊन राज्‍यात येणारे परप्रांतीय व्‍यावसायिक वाहने खरेदी करून व्‍यवसाय करीत आहेत.

त्‍याचा मोठा फटका या व्‍यवसायात असलेल्‍या स्‍थानिकांना बसत आहे. त्‍यामुळे वाहतूक संचालकांनी जारी केलेले हे परिपत्रक मागे घ्‍यावे, अशी मागणी आम्‍ही मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍याकडे केल्‍याचेही त्‍यांनी सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली.

CM Pramod Sawant On Taxi
Goa Tourism: आखाती देशांतील पर्यटक आकर्षित करण्यासाठी गोवा सज्ज! थेट बहरीनमध्ये आयोजित केलाय रोड शो

मुख्यमंत्र्यांकडून आश्‍वासनपूर्ती

ट्रक मालक संघटनांचे पदाधिकारी, वाहतूक संचालक आणि वाहतूक पोलिस अधीक्षकांची बुधवारी बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढण्‍याची हमी मुख्‍यमंत्र्यांनी त्‍यांना दिली होती. त्‍यानुसार बुधवारी पर्वरीतील मंत्रालयात झालेल्‍या बैठकीत मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्‍यांचे प्रश्‍‍न पुन्‍हा ऐकून घेतले आणि व्‍यावसायिक वाहनांची यापुढे ‘लिव्‍ह अँड लायसन्‍स’वर नोंदणी करण्‍यात येणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com