IFFI Goa 2025: "इफ्फीपर्यंत पोहोचावं कसं?" हे आहेत उत्तर-दक्षिण गोवा ते पणजीचे काही सोपे मार्ग; जाणून घ्या एका क्लिकवर

IFFI Venue Road Map: भारताचा 56वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI Goa 2025) गोव्याची राजधानी पणजी येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
IFFI Goa 2025 News
IFFI Goa 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

How to Reach an International Film Festival Of India (IFFI Goa) Venue

पणजी: भारताचा 56वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI Goa 2025) गोव्याची राजधानी पणजी येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. तुम्हीही गोव्यात असाल तुमच्यासाठी हा सोहळा पर्वणी ठरु शकतो. चला तर मग या सोहळ्याला गोव्याच्या विविध भागांमधून कसे पोहोचता येईल हे थोडक्यात जाणून घेऊया. इफ्फीचा आनंद घ्यायचा असेल तर आयनॉक्स पणजी, पर्वरी, रवींद्र भवन फातोर्डा, मिरामार इत्यादी स्थळे महत्वाची आहेत हे लक्षात घ्या.

गोव्यात कसे पोहोचाल? ( How to Reach Goa)

इफ्फीला पोहोचायचं असेल तर पणजी हे प्रमुख शहर आहे, त्यामुळे तुम्ही उत्तर गोव्यातील मोपा विमानतळ किंवा थिवी रेल्वे स्थानकावरून पणजीपर्यंतचा (Panaji) प्रवास करु शकता आणि जर का दक्षिण गोव्याहून पणजीला जाणार असाल तर दाबोळी विमानतळ किंवा मडगाव रेल्वे स्थानकावरून पणजीपर्यंत प्रवास करता येतो. याशिवाय जुने गोवे किंवा ओल्ड गोव्यातील करमळी रेल्वेस्थानक हा देखील एक उत्तम पर्याय ठरु शकतो.

IFFI Goa 2025 News
IFFI 2025: इफ्फी परेडची रंगीत तालीम अन् वाहतुकीचा बट्ट्याबोळ! 3 तास वाहनचालकांची परवड; बांदोडकर मार्गाला पोलिस छावणीचे स्वरूप

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ ते पणजी (Mopa to Panjim)

उत्तर गोव्यात (North Goa) जर का विमानाने आला असाल तर मोपा आंतराष्ट्रीय विमानतळावरुन म्हणजेच पेडण्याहून पणजीपर्यंत प्रवास करावा लागेल. मोपा ते पणजीचे अंतर सुमारे 35-40 किमी आहे आणि साधारण एका तासाभरात हे अंतर पार करता येतं. मोपाहून स्वतःची गाडी घेऊन पणजीला जाणार असाल तर NH66 चा वापर करा. या रस्त्यावरुन जात असताना मोपा विमानतळावरून तुम्हाला सर्वात आधी म्हापसा शहरात यावं लागेल आणि नंतर पर्वरीमार्गे पणजीला जाणं सहज शक्य आहे.

रस्ते मार्ग (बस प्रवास)

मुंबई, पुणे, बंगळूरु अशा मोठ्या शहरांमधून कदंब परिवहन महामंडळाच्या (KTC) आणि खासगी बसेस थेट पणजी बस स्टँडवर येतात.

मुख्य बस मार्ग

  1. मिरामार सर्कल ते INOX पर्वरी.

  2. मिरामार सर्कल ते रवींद्र भवन (मडगाव).

  3. मिरामार सर्कल ते फोंडा (Magic Movies)

याशिवाय, तुम्ही स्वतःची गाडी नसल्यास काही विशेष कष्ट घ्यावे लागणार नाहीत, विमानतळावरुन म्हापसा बसस्थाकावर पोहोचल्यानंतर केवळ अर्ध्या तासात बसने पणजीला पोहोचणे शक्य आहे. बसचा पर्याय नको असल्यास तुम्ही रेंटल टॅक्सी किंवा गाडी घेऊ शकता.

IFFI Goa 2025 News
IFFI 2025: 'इफ्फी' परेडमुळे पणजीत अर्धा दिवस सुट्टी! सरकारी कार्यालये आणि स्वायत्त संस्था दुपारनंतर बंद

दक्षिण गोव्याहून पणजीला कसं पोहोचाल?

मडगाव रेल्वेस्थानक ते पणजी (Magdaon to Panjim)

दक्षिण गोवा ते पणजी हा प्रवास काहीसा दूर असू शकतो, कारण यात तुम्हाला 35 किमी अंतर पार करावं लागेल. मडगाव रेल्वे स्थानकापासून पणजीला येत असाल तर पुन्हा एकदा NH66 हाच रास्ता महत्वाचा ठरतो. हा रास्ता नुवे, नागवे, कुठ्ठाळीमार्गे तिसवाडीला जातो, इथे तुम्ही पणजी शहरात प्रवेश करता. रेंटल गाडीने जाणार असाल तर हाच मार्ग निवडा मात्र बसने जायचा विचार करत असाल तर मडगाव बसस्थानक ते पणजी बसस्थानक असा किमान एका तासाचा प्रवास करावा लागेल.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

  • नोंदणी आवश्यक: महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रतिनिधी म्हणून नोंदणी (Delegate Registration) करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ही नोंदणी विनामूल्य आहे.

  • वाहतूक कोंडी: IFFI दरम्यान पणजी शहरात आणि मुख्य स्थळांभोवती वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळेवर पोहोचण्यासाठी नेहमी लवकर निघा.

  • IFFI ॲप: महोत्सवाचे वेळापत्रक, चित्रपट प्रदर्शनाचे बुकिंग आणि वाहतूक मार्गांची माहिती मिळवण्यासाठी IFFI Goa ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन वापरा.

IFFI Goa 2025 News
IFFI 2025 Opening: ब्राझिलियन चित्रपट ‘द ब्लू ट्रेल’ने उघडणार इफ्फीचा पडदा! काय असणार रूपरेषा; गोव्यातला फिल्म्स कोणत्या? पहा Video

IFFI स्थळांदरम्यान प्रवासाची सोय

IFFI 2025 साठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधींसाठी विशेष सोयींची घोषणा केली आहे, ज्यामुळे प्रवास करणे खूप सोपे झाले आहे.

प्रतिनिधींसाठी मोफत वाहतूक (Free Transportation)

  • IFFI मध्ये नोंदणी केलेल्या सर्व प्रतिनिधींसाठी (Delegates) महोत्सवाच्या सर्व मुख्य स्थळांदरम्यान मोफत वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • ही मोफत सेवा सकाळपासून रात्री उशिरापर्यंत (शेवटचा शो संपेपर्यंत) उपलब्ध असेल.

  • या सेवेमध्ये इलेक्ट्रिक बसेस, पूल कार (Pool Cars) आणि रिक्षा (Auto-rickshaws) यांचा समावेश असेल.

IFFI Goa 2025 News
IFFI 2025: रेड कार्पेट सजतोय! राजधानीत 'इफ्फी'ची लगबग; परिसरात उत्सवी वातावरण

भव्य उद्घाटन सोहळा

यंदा IFFI चा उद्घाटन सोहळा प्रथमच पणजीतील जुन्या GMC (गोल्डन जुबिली मेडिकल कॉलेज) इमारतीसमोर खुल्या जागेत (Open-Air) आयोजित केला जाणार आहे. या उद्घाटन समारंभात चित्रपट-थीम असलेल्या 23 फ्लोट्सचा सहभाग असेल, ज्यात गोव्यातील 11 स्थानिक फ्लोट्सचा समावेश आहे. सर्वोत्तम 5 फ्लोट्सला पारितोषिके दिली जातील.

उद्घाटन परेड (Grand Opening Parade)

यावर्षी प्रथमच IFFI ची सुरुवात भव्य परेडने होणार आहे. ही परेड 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता ESG कार्यालयाच्या जुन्या इमारतीपासून कला अकादमीकडे काढली जाईल, ज्यामुळे काही मार्गांवर वाहतूक नियमावली लागू होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com