Goa Police News Dainik Gomantak
गोवा

Touts in Goa: सोळा दलालांसह पाच भाडेकरूंना अटक; किनारपट्टीवरील गुन्हेगारी घटनांप्रकरणी पोलिसांची कारवाई

Touts in Goa: कळंगुट आणि पर्वरीत पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Touts in Goa:: कळंगुट किनाऱ्यावर उतरणाऱ्या देशी तसेच विदेशी पर्यटकांना मुली तसेच अमली पदार्थ पुरविण्याचे आमिष दाखवून त्यांना हजारो रुपयांना लुटणाऱ्या सोळा दलालांना बुधवारी कळंगुट पोलिसांनी ताब्यात घेतले.

तसेच ओळखीचा पुरावा पोलिसांना सादर करू न शकल्याने 5 भाडेकरूंना पर्वरी पोलिसांनी अटक केली.

आज पकडलेल्या दलालांना पोलिसांनी पर्यटन खात्याच्या संचालकांसमोर हजर केले असता सक्त ताकीद देत त्यांना ऐंशी हजारांचा दंड ठोठावण्यात आला.

ओळख पटविण्यात दर्शविली असमर्थता

पर्वरी : हाळीवाडा-बिठ्ठोण येथे पर्वरी पोलिसांनी भाडेकरूंकडे ओळखीचे पुरावे मागितले. मात्र, ते देऊ न शकल्याने पोलिसांनी पाच भाडेकरूंना अटक केली, तर 18 जणांना ताब्यात घेतले आहे.

पर्वरी पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी व अवैधरित्या स्थलांतरित तसेच गुन्ह्यात अडकलेल्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. भाडेकरूंकडे ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच घरमालकांकडे त्यांची माहिती असणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update:सकाळी 10 पर्यंत पाळीत सर्वाधिक, तर ताळगावमध्ये सर्वात कमी मतदान

Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

SCROLL FOR NEXT