IFFI Goa 2023: ‘इफ्फी’साठी 1,890 प्रतिनिधींनी केली नोंदणी

54व्या महोत्सवाची जय्यत तयारी : लवकरच होणार सुकाणू समितीची बैठक
IFFI Goa
IFFI GoaDainik Gomantak
Published on
Updated on

IFFI Goa गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी जोरात सुरू असून बहुतांश निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. या महोत्सवासाठी देश-विदेशातील1810 प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे.

आयोजन समितीच्या सुकाणू समितीची बैठक या महिना अखेरपर्यंत होईल, अशी माहिती आयोजक गोवा मनोरंजन संस्थेच्या वतीने देण्यात आली.

हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन आणि क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा भव्य सोहळा आहे. आतापर्यंत १,८१० प्रतिनिधींनी नोंदणी केली असून हा आकडा १० हजारापर्यंत नेण्याचा आयोजकांचा दावा आहे.

या महोत्सवासाठी आयोजक समितीने बहुतांश निविदा प्रक्रिया पूर्ण केल्या असून येत्या आठवड्याभरात सुकाणू समितीची बैठक होईल. याबाबतचे अंतिम निर्णय घेण्यात येतील.

एनएफडीसी मुख्य आयोजक

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय दरवर्षी गोवा मनोरंजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्फीचे आयोजन करते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील चित्रपट महोत्सव संचालनालय सामान्यत: या महोत्सवाचे नेतृत्व करत होते;

परंतु राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (एनएफडीसी) चित्रपट मीडिया युनिट्सचे विलिनीकरण झाल्यामुळे ‘एनएफडीसी’ने महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे.

IFFI Goa
Goa Crime: नशेचा विळखा वाढतोय! गांजा दिला नाही म्हणून अल्पवयीन मुलाला बेसबॉलच्या बॅटने मारहाण

आशिया खंडातील उत्कृष्ट महोत्सव

1952 साली मुहूर्तमेढ रोवलेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा आशियातील प्रमुख महोत्सवांपैकी एक आहे. इफ्फीने चित्रपट, मनोरंजक कथा आणि त्यामागील प्रतिभावान व्यक्तींचा गौरव करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

चित्रपटांबद्दल सखोल कौतुक आणि प्रेम वाढविणे, लोकांमध्ये समजूतदारपणा आणि सौहार्दाचे सेतू तयार करणे आणि त्यांना वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेची नवीन उंची गाठण्यासाठी प्रेरित करणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

IFFI Goa
Margao Fish Market: अखेर निर्णय झाला! किरकोळ मासे विक्रेत्यांना घाऊक मार्केटमध्ये मनाईच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com