ZP polls Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: साडेतीन तास चर्चा,पण निर्णय नाहीच! काँग्रेसच्या युतीला 'आरजी'चा अडथळा; जागावाटप अधांतरी

Goa ZP election seat sharing: रिव्होल्युशनरी गोअन्स पक्षासोबत युती करण्यावरून काँग्रेसच्याच काही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले, ज्यामुळे बैठकीत वाद-प्रतिवाद झाले

Akshata Chhatre

पणजी: आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपला शह देण्यासाठी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी करत असलेल्या समविचारी पक्षांसोबतच्या युतीच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. सोमवार (२४ नोव्हेंबर) रोजी साडेतीन तास चाललेल्या बैठकीनंतरही काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्युशनरी गोअन्स या पक्षांमध्ये जागावाटपाचा निर्णय होऊ शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिव्होल्युशनरी गोअन्स पक्षासोबत युती करण्यावरून काँग्रेसच्याच काही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले, ज्यामुळे बैठकीत वाद-प्रतिवाद झाले.

'आरजी'मुळे बैठकीत वाद आणि गोंधळ

काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिव्होल्युशनरी गोअन्स पक्षाला युतीत सामील करण्याच्या कल्पनेला काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी जोरदार विरोध दर्शविला. त्यामुळे बैठकीतील वातावरण तापले आणि यावर वादविवाद झाले. या अंतर्गत मतभेदामुळे जागावाटपाच्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे, अंजली निंबाळकर यांच्यासह प्रमुख नेते सहभागी झाले होते.

फोनाफोनीने चर्चा पुढे नेली

गोवा काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी मात्र ही बैठक प्रगतीशील असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, "समविचारी पक्षांसोबत युती करण्यात प्रगती झाली आहे. आम्ही गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई आणि रिव्होल्युशनरी गोअन्सचे मनोज परब यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे." पाटकर यांच्या म्हणण्यानुसार, अजून काही जागांवर चर्चा होणे बाकी आहे आणि यावर अंतिम निर्णय मंगळवारी (२५ नोव्हेंबर) घेतला जाण्याची शक्यता आहे.

भाजपचा पराभव हेच मुख्य लक्ष्य

माजी आमदार विजय सरदेसाई यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेससोबत युती करण्यास सकारात्मक असला तरी, रिव्होल्युशनरी गोअन्स सोबतच्या युतीच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये अजूनही एकमत होताना दिसत नाहीये.

भाजपला पराभूत करणे हेच या युतीचे मुख्य लक्ष्य असूनही, जागावाटपातील गुंतागुंत आणि काही पक्षांच्या समावेशावरील अंतर्गत वादामुळे काँग्रेसची 'महायुती' करण्याची योजना अद्याप मूर्त रूप घेऊ शकलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT