GCET Result 2023 Dainik Gomantak
गोवा

GCET Result 2023: अदीप, अथर्व, हेमांशिनी ‘जीसीईटी’मध्‍ये अव्‍वल

निकाल जाहीर : उद्यापासून व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया

गोमन्तक डिजिटल टीम

GCET Result 2023: तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) गोवा कॉमन एन्टरन्स टेस्ट (जीसीईटी) २०२३चा निकाल आज जाहीर केला. यामध्‍ये अदीप कुंकळ्येकर, अथर्व नाईक, हेमांशिनी देसाई यांनी अनुक्रमे भौतिकशास्र, रसायनशास्‍त्र व गणितात अव्‍वल कामगिरी बजावली.

राज्‍यात 5 अभियांत्रिकी महाविद्यालयांत 1500 जागा असून, शुक्रवार 19 मेपासून प्रवेश अर्ज स्‍वीकारण्‍यात येतील. तांत्रिकी शिक्षण खात्‍याचे संचालक विवेक कामत यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निकाल जाहीर केला.

याप्रसंगी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, जीसीईटीचे चेअरमन डॉ. व्‍ही. एन. शेट, उपसंचालक कुस्‍नूर उपस्‍थित होते. जीसीईटी ही गोव्यातील अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांसाठी पात्रता परीक्षा आहे. 13 आणि 14 मे रोजी झालेल्या परीक्षेसाठी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रासाठी एकूण 3,224 तर गणितासाठी 2476 उमेदवारांनी नोंदणी केली होती.

पुढील वर्षापासून जीसीईटी बंद

तांत्रिकी शिक्षण संचालनालयानेही २००५ साली जीसीईटी सुरू केली होती. जीसीईटीचा आज, बुधवारी जाहीर झालेला निकाल शेवटचा ठरला आहे. यापुढे जीसीईटी परीक्षा बंद होणार आहे.

पुढील वर्षापासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाईल. जेईई किंवा नीट परीक्षा, ज्यात अधिक गुण मिळाले ते गृहित धरून अभियांत्रिकी आणि फार्मसी प्रवेश देण्यात येणार आहे.

‘मुष्‍टिफंड आर्यन’चे यश

जीसीईटीमध्ये नेहमीप्रमाणे ‘मुष्‍टिफंड आर्यन’च्‍या ११ विद्यार्थ्यांनी यश प्राप्‍त केले. या संदर्भात ‘आर्यन’चे ​व्यंकटेश प्रभुदेसाई म्‍हणाले, मुष्‍टिफंड आर्यन उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांना गेल्या १८ वर्षांपासून जीसीईटी स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल क्रमांक मिळवण्याच्या त्यांच्या संस्थेच्या वारशाबद्दल अभिमान वाटतो.

यांची कामगिरी सरस

भौतिशास्त्रात, अदिप कुंकळ्येकर (६१), अथर्व नाईक (५६), वॉरेन तावरेस (५६), पलाश आंगले (५४), श्रेयस चव्हाण (५२), वैष्णवी पोतेकर (५२); रसायनशास्त्रात, अथर्व नाईक (७०), आर्यन काकोडकर (६५), सुधीन कौशल (६५), नंदिनी रांगणेकर (६५), अदिप कुंकळयेकर (६५), पलाश आंगले (६५), विश्वेश सावंत (६५) तर गणितात, हेमांशीनी देसाई (७१), श्रेयस चव्हाण (७०), वॉरेन तावरेस (७०), पलाश आंगले (६९) आणि अदिप कुंकळ्येकर (६८) गुण जीसीईटी प्रवेश परीक्षेत मिळाले.

माझे यश मी माझ्या पालकांना समर्पित करतो. आयआयटीमध्ये प्रवेश घेणे आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणे हे माझे लक्ष्य आहे. शिक्षक व्यंकटेश प्रभुदेसाई यांनी मार्गदर्शन केले. मला BITS सीईटी आणि जेईई मुख्य परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे आहे. - अथर्व नाईक

आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे आणि राष्ट्रीय स्तरावरील जेईई परीक्षा उत्तीर्ण करण्याचे माझे ध्येय आहे. भौतिकशास्त्राचे शिक्षक श्यामसुंदर रमण यांनी मला हा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवला. भविष्यात मला इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचे आहे. - अदीप कुंकळ्येकर

माझ्या यशाचे श्रेय मी माझ्या कुटुंबाला आणि आमच्या मुख्याध्यापकांना देते. ते सतत माझ्या पाठिशी उभे राहिलेत. आयआयटीमध्ये प्रवेशासाठी मी प्रयत्न करत असून अभियांत्रिकी क्षेत्रात करियर करण्यास इच्छुक आहे. - हेमांशिनी देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT