Nirajsingh Rathod: भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे मंत्रीपदासाठी पैसे मागणाऱ्या गुजरातच्या भामट्यास अटक

नागपूर पोलिसांची कारवाई : भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा पीए असल्याचे सांगून मंत्रीपदासाठी अनेक भाजप आमदारांकडे मागितले पैसे
Nirajsingh Rathod arrested
Nirajsingh Rathod arrested Dainik Gomantak

Nirajsingh Rathod Arrested: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून अनेक भाजप आमदारांकडून पैशांची मागणी करणाऱ्या भामट्यास नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. निरजसिंग राठोड असे या भामट्याचे नाव आहे.

त्याने आमदारांना मंत्रीपदाचे आमिष दाखवत पैशांची मागणी केली होती. यात गोव्यातील भाजप आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडेही त्याने पैशांची मागणी केली होती.

Nirajsingh Rathod arrested
Mapusa Municipal Council: म्हापशातील नगरसेवक तारक आरोलकर अपात्र होणार? जातीचा दाखला अवैध

राठोड हा मूळचा गुजरातचा आहे. तो मोरबी, अहमदाबाद येथील रहिवासी आहे. महाराष्ट्रातील चार आमदारांसह नागालँडमधील आमदारांनाही फोन करून मंत्रीपदे मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले होते. काही आमदारांनी नीरजला मंत्रीपदासाठी पैसेही दिले होते, असे कळते.

महाराष्ट्रातील नागपूर पोलिसांनी अहमदाबाद येथून राठोडला अटक केली. एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळवून देण्याच्या नावाखाली चार आमदारांकडून त्याने पैशांची मागणी केली होती. तो स्वतःला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा पीए असल्याचे सर्वांना सांगत होता.

Nirajsingh Rathod arrested
Bhopal-Goa Flight: भोपाळ-गोवा विमानसेवा 23 मे पासून नाही; आता 'या' तारखेपासून होणार सुरू

भाजपचे नागपूर मध्य मतदारसंघातील आमदार विकास कुंभारे यांनी राठोड विरोधात तक्रार दाखल केली होती. राठोड याने मंत्रीपदासाठी आमिष दाखविले. राठोड याने आमदार कुंभारे यांच्याकडे महाराष्ट्र मंत्रिमंडळात स्थान मिळवून देण्यासाठी 1 कोटी 67 लाख रूपये मागितले होते.

तथापि, कुंभारे यांनी राठोला पैसे दिले नाहीत. इतर काही आमदारांनी त्याला पैसे दिले आहेत, असे समजते. पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com