Bhopal-Goa Flight: भोपाळ-गोवा विमानसेवा 23 मे पासून नाही; आता 'या' तारखेपासून होणार सुरू

केवळ दोन तासांचा प्रवास
Bhopal-Goa Flight Details
Bhopal-Goa Flight Details Dainik Gomantak

Bhopal-Goa Flight New Timetable: मे महिन्यातील 23 तारखेपासून इंडिगो एअरलाईन्सची भोपाळ-गोवा विमानसेवा सुरू होणार होती. तथापि, आता नियोजित तारखेला ही सेवा सुरू होणार नाही. तर या सेवेची सुरवात पुढील महिन्यापासून होणार असल्याचे समोर आले आहे.

भोपाळ ते गोवा दरम्यान इंडिगोची विमानसेवा आता १ जूनपासून सुरू होणार आहे. 23 मे रोजी पहिली फ्लाइट सुरू करण्याची तारीख घोषित करून, मार्च अखेरपासून बुकिंग सुरू केले गेले होते.

तथापि, सोमवारी इंडिगोच्या बुकिंग वेबसाइटवर या फ्लाइटचे बुकिंग तपासले असता, ऑगस्टपर्यंत याबाबत कोणतीही माहिती लोड करण्यात आली नव्हती.

Bhopal-Goa Flight Details
Goa Mission Rebies: गोव्याच्या 'मिशन रेबीज'साठी एडिनबर्ग विद्यापीठासोबत करार; इतर देशही राबवणार हे मॉडेल

त्यानंतर इंडिगो व्यवस्थापनाने 1 जूनपासून भोपाळ-गोवा फ्लाइट सुरू करणार असल्याबाबत नवीन वेळापत्रक जाहीर केले. तसेच दरही नव्याने लोड केले. विमानाचे समायोजन करण्यात अडचण आल्याने गोव्याचे उड्डाण मे महिन्याच्या अखेरीऐवजी जूनला हलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या विमानसेवेमुळे थेट मध्य भारतातून अवघ्या दोन तासांमध्ये गोव्यात पोहचता येणार आहे. यापुर्वी भोपाळमधील रहिवाशांना विमान प्रवासात मुंबई किंवा बंगळुरूमार्गे गोव्याला जावे लागायचे.

Bhopal-Goa Flight Details
Gomantak Vibhushan: विनायक खेडेकर, प्रभाकर कारेकर यांना यंदाचा गोमंतक विभुषण पुरस्कार जाहीर

भोपाळ ते उत्तर गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी ही फ्लाईट असेल. या फ्लाईटच्या तिकिटाचे दर 4,000 रुपये इतका आहे.

फ्लाइट शेड्यूल

  • गोव्याहून प्रस्थान- सकाळी 09 वाजून 40 मिनिटांनी

  • भोपाळमध्ये आगमन सकाळी 11 वाजून 40 मिनट

  • भोपाळहून प्रस्थान दुपारी 12 वाजून 10 मिनटांनी

  • गोव्यात आगमन दुपारी 02 वाजून 05 मिनिटांनी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com