Mapusa Municipal Council: म्हापशातील नगरसेवक तारक आरोलकर अपात्र होणार? जातीचा दाखला अवैध

समाज कल्याण विभागाच्या छानणी समितीचे जातीचा दाखला रद्द करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Taral Arolkar | Mapusa Municipal Council
Taral Arolkar | Mapusa Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Councillor Tarak Arolkar: म्हापसा नगरपालिकेतील एका नगरसेवकाचा जातीचा दाखला अवैध ठरला आहे. तारक आरोलकर असे या नगरसेवकाचे नाव आहे. समाज कल्याण विभागाच्या छानणी समितीने याबाबत निर्णय दिला आहे.

समितीने बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना हा जातीचा दाखला रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

(Mapusa Municipal Councillor's caste certificate was not verified)

Taral Arolkar | Mapusa Municipal Council
Bhopal-Goa Flight: भोपाळ-गोवा विमानसेवा 23 मे पासून नाही; आता 'या' तारखेपासून होणार सुरू

एप्रिल 2021 मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीआधी तारक आरोलकर यांनी ओबीसी गटातील जातीचा दाखला दिला होता.

पण या दाखल्याची पडताळणी झालेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा दाखला रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, या कारवाईमुळे आता आरोलकर यांचे नगरसेवकपद जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणी फ्रँकी कार्व्हालो यांनी तक्रार दाखल केली होती.

Taral Arolkar | Mapusa Municipal Council
Goa Mission Rebies: गोव्याच्या 'मिशन रेबीज'साठी एडिनबर्ग विद्यापीठासोबत करार; इतर देशही राबवणार हे मॉडेल

एप्रिल महिन्यात बार्देश तालुक्यात कोलवाळ येथे बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला होता. ज्या ठिकाणी हे बेकायदा कॉल सेंटर चालवले जात होते ती जागा नगरसेवक तारक आरोलकर (Tarak Arolkar) यांच्याशी संबधित होती.

याप्रकरणी आरोलकर यांना अटक झाली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली. आरोलकर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँगेसचे उमेदवार होते. तारक आरोलकर यांनी ही जागा माझ्याशी संबधित असली तरी ती भाडेतत्वावर दिली होती, असे स्पष्ट केले होते.

अॅमेझॉन या ई कॉमर्स संकेतस्थळ कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करून या कॉल सेंटरमधून अनेकांची फसवणूक केली गेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com